हरियाणा आणि केरळ यांच्यात सध्या रणजी ट्रॉफीचा सामना खेळला जात आहे. या सामन्यात हरियाणाचा वेगवान गोलंदाज अंशुल कंबोज यानं एक अद्भूत इतिहास रचला. कंबोजनं केरळविरुद्ध पहिल्या डावात सर्व 10 विकेट घेतल्या! 21व्या शतकात अशी कामगिरी करणारा तो पहिलाच गोलंदाज आहे.
अंशुल कंबोजनं केरळविरुद्ध 30.1 षटकं गोलंदाजी केली. यामध्ये त्यानं 9 षटकं मेडन टाकली. कंबोजनं 49 धावा देत सर्व 10 विकेट घेतल्या. त्याच्या गोलंदाजीच्या जोरावर केरळचा संघ पहिल्या डावात 291 धावांवर ऑलआऊट झाला.
23 वर्षीय अंशुल कंबोज आयपीएल 2024 मध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळला होता. आपल्या पदार्पणाच्या हंगामात त्यानं मुंबईसाठी 3 सामने खेळले. यामध्ये त्यानं 2 विकेट घेतल्या. आयपीएल 2025 साठी मुंबई इंडियन्सनं त्याला रिटेन केलेलं नाही. त्यामुळे आता तो मेगा लिलावात दिसणार आहे.
अंशुलनं 2022 मध्ये हरियाणाकडून त्रिपुरा विरुद्ध प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. आयपीएल (IPL 2024) मध्ये त्यानं मुंबई इंडियन्ससाठी पहिला सामना खेळला. त्यानं सनरायझर्स हैदराबादविरुद्ध पदार्पण केलं आणि स्टार भारतीय फलंदाज मयंक अग्रवालची विकेट घेतली होती.
अंशुल ताशी 140 किमी वेगाने गोलंदाजी करू शकतो. याच वेगानं गोलंदाजी करत राहणं ही त्याची सर्वात मोठी ताकद आहे. त्यानं यापूर्वी अंडर 19 स्तरावर भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. अंशुल दुलीप ट्रॉफी 2024-25 दरम्यान चर्चेचा केंद्रबिंदू बनला होता, जिथे त्यानं इंडिया सी कडून खेळताना एकाच डावात 8 विकेट घेतल्या होत्या.
हेही वाचा –
IND vs AUS: विराट कोहलीचा फ्लॉप शो सुरूच, सराव सामन्यातही धावा निघेना!
बॉर्डर-गावस्कर मालिकेतील ऑलटाइम प्लेइंग 11, वीरेंद्र सेहवागसह या दिग्गज खेळाडूंचा समावेश
IND VS SA; चौथ्या टी20 सामन्यात टीम इंडिया बदल करणार? या खेळाडूबाबत प्रश्नचिन्ह