कोेरोनामुळे भारताच्या देशांतर्गत क्रिकेटवर खूप परिणाम झाला आहे. असे असले तरी आता सगळ्या गोष्टी पुन्हा रुळावर येत आहेत. रणजी ट्राॅफी स्पर्धा पुढच्या वर्षी होत आहेत. अशात ओडिसाच्या संघाने अंशुमान रथला संघात सामील केले आहे. रथ यापूर्वी हाँगकाँगच्या संघासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत होता. तो आता ओडिसाच्या संघाकडून रणजी क्रिकेट खेळणार आहे.
हाँगकाँगमध्ये जन्मलेल्या रथचे आई-वडील मुळचे ओडीसाचेच आहेत. रथने १८ एकदिवसीय आणि २० टी-२० सामने हाँगकाँग संघासाठी खेळले आहेत. याव्यतिरिक्त त्यानी पाच प्रथम श्रेणी सामनेही खेळले आहेत, मात्र हे सामने कोणत्याही चॅम्पियनशिपचा भाग नव्हते.
रथने क्रिकबजशी बोलताना सांगितले की, ओडिसा क्रिकेट असोसिएशनने (ओसीए) शानदार स्वागत केले आहे आणि खेळाडू खूप मैत्रीपूर्ण आहेत. मी यावर्षी ओडिसाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी उत्सुक आहे. मला माझ्या कम्फर्ट झोनच्या बाहेर जायचे होते. मला वाटते की हाँगकाँगमध्ये खूप वेळ होतो. वास्तवात मी एका आव्हानात्मक वातावरणात खेळू इच्छित होतो, जे खूप व्यावसायिक असेल आणि यासाठी भारतापेक्षा चांगली जागा कोणती असू शकते.
रथचा आतापर्यंतचा प्रवास पाहिला तर तो चांगला राहिला आहे, २०१५ मध्ये त्याने टी-२० क्वालीफायर सामन्यात अप्रतिम खेळी केली होती. तो आयसीसी विश्व क्रिकेट लीग स्पर्धेचाही भाग होता. तेथे त्याने सर्वाधिक धावा केल्या होत्या. त्याव्यतिरिक्त त्याने आयसीसी इंटर-काॅन्टिनेंटल चषक, विश्व क्रिकेट लीग डिवीजन टू आणि २०१८ मध्ये विश्वचषकाच्या क्वालीफायर सामन्यातही सहभाग घेतला होता. त्याने हाँगकाँगचे नेतृत्वही केले आहे.
ओडिसाच्या संघासोबत खेळताना आता त्याच्या रणजी ट्राॅफीतील खेळ पाहण्यासारखा असेल. तो २०१९ मध्ये विदर्भाच्या संघासोबत रणजी ट्राॅफीत खेळणार होता. मात्र कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रणजी सामने होऊ शकले नाहीत. यादरम्यान त्याने एका मुलाखतीत सांगितले की, मी भारतात आधीच शिफ्ट होणार होतो. मात्र, येथे क्रिकेटमध्ये स्पर्धा खूप जास्त आहे.
सन २०१८ मध्ये आशिया चषकात भारताविरुद्ध खेळताना हाँगकाँगच्या संघाने रथच्या खेळीच्या जोरावर सामना जवळपास जिंकलाच होता. पण त्या सामन्यात रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली युजवेंद्र चहल आणि कुलदीप यादवने हाँगकाँगच्या फलंदाजीला अखेरीस रोखला लावला होता. त्यामुळे भारत केवळ २६ धावांनी सामना जिंकला होता. त्या सामन्यात रथने ७३ धावांची खेळी केली होती.
महत्त्वाच्या बातम्या –
Video: अमेरिकेत उन्मुक्त चंदची बॅट तळपली; चौकार-षटकारांची बरसात करत ठोकले दुसरे अर्धशतक
रविंद्र पेहेलला लागली ७४ लाखांची बोली; ‘या’ संघाच्या ताफ्यात झाला सामील
आरसीबी संघासाठी वाईट बातमी! ‘या’ अष्टपैलू खेळाडूने आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यातून घेतली माघार