---Advertisement---

‘काय मनमोहक उन्हाळा आहे’; अनुष्का इंग्लंडच्या वातावरणाचा लुटतेय आनंद, पाहून तुम्हीही पडाल प्रेमात

On: गुरूवार, जून 10, 2021 10:58 AM
---Advertisement---

गेल्या कित्येक महिन्यांपासून क्रिकेट चाहते विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. हा सामना येत्या १८ जून ते २२ जून दरम्यान द रोज बाउल स्टेडियम, साउथम्पटन येथे खेळला जाणार आहे. या सामन्यानंतर भारतीय संघाला इंग्लंड संघाविरुद्ध ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. तब्बल साडे तीन महिने चालणाऱ्या या दौऱ्यासाठी बीसीसीआयने खेळाडूंसोबत कुटुंबातील सदस्यांना देखील घेऊन जाण्याची परवानगी दिली आहे.

त्यामुळे कर्णधार विराट कोहलीसह त्याची पत्नी अनुष्का शर्मा आणि लेक वामिका हे देखील इंग्लंडमध्येच आहेत. अशातच अनुष्काने इंग्लंडच्या मनमोहक वातावरणाचा आढावा देणारा एक फोटो शेअर केला आहे.

अनुष्का शर्मा ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती काही-ना-काही फोटोज् आणि व्हिडिओ शेअर करत चाहत्यांचे मनोरंजन करत असते. सध्या ती विराट कोहलीसह इंग्लंडमध्ये आहे. अशातच तिने साउथम्प्टनच्या मनमोहक वातावरणाचा आढावा देणारा एक व्हिडिओ आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे. परंतु स्टेडियममध्ये धुक्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे काही स्पष्ट दिसून येत नाहीये. परंतु उन्हाळ्यातही इंग्लंडमध्ये पडलेले भरगच्च धुके तिच्या मनाला भोवले आहे.

यापूर्वी देखील अनुष्का शर्माने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला होता, ज्यामध्ये ती मनसोक्त हसताना दिसून आली होती. तसेच हा फोटो तिने साउथम्प्टन स्टेडियमच्या स्टँडमध्ये उभा राहून क्लिक केल्याचे दिसून आले होते. या फोटोला तिने कॅप्शन देत लिहिले होते की, “काम घरी न घेऊन येण्याचा नियम काही वेळ विराटवर लागु होणार नाही.”

सध्या विराट आणि अनुष्का हे दोघेही साउथम्पटन स्टेडियमच्या हॉटेलमध्ये विलगिकरणात आहेत. तसेच वामिका देखील या दौऱ्यावर त्यांच्यासोबत आहे.

https://www.instagram.com/p/CPu1oObpGoG/?utm_medium=copy_link

अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांची जोडी सोशल मीडियावर खूप प्रसिद्ध आहे. विराट कोहली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्टार क्रिकेटपटू आहे. तर अनुष्का शर्माने देखील सिनेसृष्टीत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिचा ‘झिरो’ हा शेवटचा चित्रपट होता. त्यानंतर तिने अद्याप कुठलाही चित्रपट केला नाहीये.

महत्त्वाच्या बातम्या-

आनंदी आनंद गडे! सामना विजयानंतर केन्या महिलांचे लक्षवेधी सेलिब्रेशन, केला जबराट डान्स

याला म्हणतात धावांचा पाऊस! वर्ल्ड टेस्ट चँपियनशीपमध्ये धावांचा डोंगर उभारणारे ५ फलंदाज

‘टीव्ही पे युट्युब क्यू नहीं होता,’ म्हणत वॉर्नर-राशिदचा तुफान कॉमेडी डान्स व्हायरल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---