सध्या दिल्ली प्रीमियर ही स्पर्धा खेळली जात आहे. या स्पर्धेचा हा पहिलाच हंगाम आहे. दरम्यान आयपीएलमधील राॅयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघासाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. गुरुवारी (29 ऑगस्ट) रात्री दिल्ली प्रीमियर लीग (DPL T20) मध्ये जुनी दिल्ली 6 आणि त्याच्या चाहत्यांच्या आशा भंगल्या, पण आरसीबीच्या आशा नक्कीच फुलल्या असतील. कारण डीपीएलमध्ये ज्याच्या बॅटनं वादळ आलं तो खेळाडू आयपीएलमध्ये आरसीबीकडून खेळतो.
दिल्ली प्रीमियर लीगमध्ये (DPL 2024) यष्टीरक्षक अनुज रावतनं (Anuj Rawat) तुफानी फलंदाजी केली. त्यानं 121 धावांची आक्रमक शतकी खेळी खेळली. अनुज रावतनं 61 चेंडूंच्या खेळीत 6 चौकारांसह 11 षटकार उत्तुंग षटकार ठोकले.
अनुज रावतचं वय संध्या 24 वर्ष आहे. डीपीएलमध्ये तो ईस्ट दिल्ली रायडर्सकडून खेळतो. सलामीवीर अनुज रावत आणि सुजल सिंग यांच्या शतकांमुळे पूर्व दिल्लीनं जुन्या दिल्लीचा 26 धावांनी पराभव केला. पूर्व दिल्लीनं 20 षटकांच्या एका डावात एकही विकेट न गमावता विजयी 241 धावा केल्या. प्रत्युत्तरात जुनी दिल्लीला 8 विकेट्स गमावून 215 धावा करता आल्या. जुन्या दिल्लीसाठी वंश बेदीनं 41 चेंडूत सर्वाधिक 96 धावांची खेळी खेळली.
शतक झळकावण्याबाबत आणि आरसीबीमध्ये कायम ठेवण्याबाबत अनुज रावत (Anuj Rawat) म्हणाला, “शतक ठोकणे हा नेहमीच चांगला अनुभव असतो आणि त्यामुळे आत्मविश्वास वाढतो. खेळाडू म्हणून चांगले खेळणे हे आमचे काम आहे. आशा आहे की प्रत्येकजण (RCB व्यवस्थापन) पाहत असेल.”
महत्त्वाच्या बातम्या-
10 लाखापासून सुरुवात, आता कोट्यावधी रुपयांचा मालक; पाहा याॅर्कर किंगची नेटवर्थ
DRS मुळे बाद होणारा ‘हा’ आहे जगातील पहिला फलंदाज
क्रिकेटमध्ये चक्क ‘इतक्या’ प्रकारे बाद होऊ शकतो एक फलंदाज, वाचा सविस्तर