---Advertisement---

अनुज रावतचा सुपर थ्रो! पृथ्वी शॉ आयपीएल हंगामातील सलग पाचव्या सामन्यात अपयशी

Anuj Rawat
---Advertisement---

दिल्ली कॅपिटल्सचा सलामीवीर फलंदाज पृथ्वी शॉ पुन्हा एकदा अपयशी ठरला. पृथ्वी शॉ आयपीएल 2023 सह मागच्या मोठ्या काळापासून धाव करण्यासाठी झगडताना दिसला आहे. शनिवारी (15 एप्रिल) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्ध त्याने शुन्यावर विकेट गमावली. इम्पॅक्ट खेळाडू म्हणून मैदानात आलेल्या अनुज रावत याने एक जबरदस्त थ्रो करत शॉला पहिल्याच षटकात धावबाद केले.

आरसीबीविरुद्धच्या सामन्यात दिल्लीला विजयासाठी निर्धारीत 20 षठकांमध्ये 175 धावांचे लक्ष्य मिळाले होते. पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) आणि कर्णधार डेविड वॉर्नर (David Warner) दिल्लीच्या डावाची सुरुवात करण्यासाठी खेळपट्टीवर आले. दिल्लीच्या डावातील पहिले षटक टाकण्यासाठी मोहम्मद सिराज आला. षटकातील दुसऱ्या चेंडूवर स्ट्राईकवर असलेल्या वॉर्नरने एक धाव घेतली आणि पृथ्वी शॉ स्ट्राईकवर आला. षटकातील चौथा चेंडू शॉने कव्हर्सच्या दिशेने खेळला, जो 30 यार्ड सर्कलच्या बाहेर जाणार, असे वाटत होते.

मात्र, त्याठिकाणी उभा असलेला अनुज रावत (Anuj Rawat) याने चपळाई दाखवली आणि अप्रतिन डाईव्ह मारून हा चेंडू अडवला. अनुज एवढ्यावरच थांबला नाही. त्याने हा चेंडू हातत घेतल्यानंतर क्षणात तो उभा राहिला आणि नॉन स्ट्राईकवर फेकून मारला. अनुजचा हा थ्रो अचूक असल्यामुळे त्या शॉ क्रिजच्या आतमध्ये पोहोचण्यापूर्वी स्टंप्सवर निशाणा साधला. परिणामी शॉ दोन चेंडू खेळून शुन्यावर बाद झाला. अनुज रावतचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

दरम्यान, उभय संघांतील या सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर आरसीबीने प्रथम फलंदाजी कपताना 6 बाद 174 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात दिल्ली कॅपिटल्स संघ 20 षटकांमध्ये 9 बाद 151 धावांपर्यंत मजल मारू शकला. विराट कोहलीने आरसीबीसाठी 34 चेंडूत 50 धावांचे योगदान दिले, ज्यासाठी त्याला सामनावीर म्हणून निवडण्यात आले.  (Anuj Rawat’s super throw! Prithvi Shaw failed in the fifth consecutive match of the IPL season)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-

LSGvPBKS: शिखर धवनला दुखापत, सॅम करूनच्या नेतृत्वातील पंजाबचा गोलंदाजीचा निर्णय, पाहा प्लेइंग इलेव्हन
चिन्नास्वामीवर विराटची सत्ता! बनला टी20 क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा एकमेव

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---