fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

अनुप कुमार हा भारतीय कबड्डीचा हिरा – श्रीकांत जाधवने उधळली स्तुतीसुमने

अनुप कुमार (Anup Kumar) हा कबड्डीचा हिरा आहे असे म्हणत राष्ट्रीय कबड्डीपटू श्रीकांत जाधव (Shrikant Jadhav) याने अनुपवर स्तुतीसुमने उधळली आहेत. खेल कबड्डी डॉट इन (khelkabaddi.in) या वेबसाईटच्या फेसबुक पेजवरून आपल्या चाहत्यांशी संवाद साधताना श्रीकांतने हे वक्तव्य केले.

अनुप मनाने खूप चांगला आहे. तो नव्या खेळाडूंना सांभाळून घेतो. नवनवीन डावपेच शिकवतो. त्याच्या आंतरराष्ट्रीय अनुभवाचा नव्या खेळाडूंना कसा फायदा होईल याच्याकडे तो कायम लक्ष देतो. त्याच्याबद्दल बोलावे तेवढे कमीच आहे.

यावेळी त्याने अनुप कुमार बरोबरच शब्बीर बापू हाही प्रो कबड्डीमधील (Pro Kabaddi)आपला आवडता खेळाडू असल्याचे सांगितले. श्रीकांत अनुपच्या नेतृत्वाखाली यु मुंबाकडून (U Mumba) प्रो कबड्डीच्या ५ व्या हंगामात खेळला होता. आता श्रीकांत युपी योद्धा या संघाकडून प्रो कबड्डीमध्ये खेळतो.

श्रीकांत हंगाम २ मध्ये जयपूर पिंक पँथर्स, हंगाम ३ व ४ मध्ये बंगाल वॉरियर्स कडून खेळला आहे. जयपूर येथे नुकत्याच पार पडलेल्या ६७ व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत श्रीकांतने रेल्वेकडून खेळताना विजेतेपद मिळवले. या स्पर्धेत त्याला संघात खेळायची संधी कमी मिळाली. मिळालेल्या संधीत ९ गूण नोंदवत संघाच्या विजयास हातभार लावला.

National Gold Medalist Indian Railway Player Shrikant Jadhav Live…

Khel Kabaddi खेल कबड्डी ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಗುರುವಾರ, ಏಪ್ರಿಲ್ 9, 2020

You might also like