भारत सरकारच्या २०१९ मध्ये निर्वाचित झालेल्या मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार बुधवारी (७ जुलै) पार पडला. जुन्या १२ मंत्र्यांना डच्चू देत अनेक नव्या चेहऱ्यांना यावेळी मंत्रिमंडळात संधी देण्यात आली. भारत सरकारमध्ये अर्थ राज्यमंत्री असलेल्या अनुराग ठाकूर यांच्याकडे आता क्रीडा व युवक कल्याण या खात्याचे कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आले आहे. विशेष म्हणजे ठाकूर यांचा खेळाशी नजीकचा संबंध असून ते यापूर्वी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष राहिले आहेत.
पंतप्रधानांनी केली निवड
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या दुसर्या कार्यकाळातील पहिला मंत्रिमंडळ विस्तार बुधवारी जाहीर केला. यामध्ये, क्रीडा व युवक कल्याण या खात्याचे मंत्री असलेल्या किरण रिजीजू यांच्या ऐवजी अनुराग ठाकूर यांची वर्णी लावण्यात आली. रिजीजू यांच्यापूर्वी ओलंपिक पदक विजेते राज्यवर्धन सिंग राठोड हे या खात्याचा कारभार पाहत.
ठाकूर यांचा खेळाशी नजीकचा संबंध
हिमाचल प्रदेशातील हमीरपुर लोकसभा मतदारसंघाचे खासदार असलेल्या ठाकूर यांना क्रिकेट प्रशासनाचा भरपूर अनुभव आहे. ४६ वर्षीय ठाकूर यांनी काही वर्ष हिमाचल प्रदेश क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले होते. त्यानंतर ते बीसीसीआयचे सचिव बनले. मे २०१६ ते फेब्रुवारी २०१७ या काळात ते बीसीसीआयचे अध्यक्ष देखील होते. ठाकूर यांचे बंधू अरुण धुमल हे बीसीसीआयचे खजिनदार आहेत. ठाकूर हे अनेक चॅरिटी सामन्यांमध्ये सहभागी झालेले देखील दिसतात.
रवी शास्त्री यांनी केले अभिनंदन
वरिष्ठ भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी अनुराग ठाकूर यांची क्रीडा मंत्री म्हणून निवड झाल्यानंतर ट्विटरद्वारे अभिनंदन केले.
https://twitter.com/RaviShastriOfc/status/1412825846788739076?s=20
शास्त्री यांनी आपल्या ट्वीटमध्ये लिहिले, ‘बीसीसीआयचे माजी अध्यक्ष अनुराग ठाकूर यांना कॅबिनेट मंत्रिमंडळात क्रीडामंत्री पाहून आनंद झाला. खूप खूप अभिनंदन’ पुढील तीन वर्षांत त्यांच्याकडून क्रीडाक्षेत्रासाठी भरीव योगदानाची अपेक्षा सर्व खेळाडू करत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
मन जिंकलं! टीम इंडियासह आपला २१ वा वाढदिवस साजरा करण्यापूर्वी पडीक्कलने धोनीला दिल्या खास शुभेच्छा
‘तुझ्याकडे एकच स्वेटशर्ट आहे का?’ जडेजाने ‘त्या’ फोटोमुळे केले शार्दुल ठाकूरला ट्रोल
विराट कोहलीने आपला पहिला आंतरराष्ट्रीय कर्णधार धोनीला ‘अशा’ दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा





