---Advertisement---

अनुष्का शर्मा हॉस्पिटलमध्ये दाखल; लवकरच मिळणार गुडन्यूज?

On: सोमवार, जानेवारी 11, 2021 3:59 PM
---Advertisement---

भारताचा कर्णधार विराट कोहलीची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्माला सोमवारी मुंबईतील ब्रिज कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. ती नऊ महिन्याची गर्भवती असून लवकरच ती त्यांच्या पहिल्या बाळाला जन्म देणार असल्याचे वृत्त समोर येत आहे.

विराटने घेतली पालकत्व रजा – 

विराटने काही दिवसांपूर्वीच आपल्या बाळाचे आगमन होणार असल्याने पालकत्व रजा बीसीसीआयकडून मंजूर करुन घेतली होती. त्यामुळे तो ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील वनडे, टी२० मालिका आणि कसोटी मालिकेतील पहिला सामना खेळून भारतात परतला होता. सध्या तो अनुष्काबरोबर असून त्याने म्हटले होते की त्याला त्याच्या आयुष्यातील या सुंदर क्षणांचा साक्षीदार व्हायचे आहे. या क्षणांना तो गमावू इच्छित नाही.

काही महिन्यांपूर्वी दिली होती गोड बातमी –

विराट आणि अनुष्काने ऑगस्ट २०२० मध्ये सर्वांना नवीन पाहुणा येणार असल्याची गोड बातमी दिली होती. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत सांगितले होते की जानेवारी २०२१ मध्ये ते दोघेही पहिल्यांदाच आई-बाबा होणार आहेत.

इटलीमध्ये झाले लग्न – 

विराट आणि अनुष्काने इटलीमध्ये १० डिसेंबर २०१७ रोजी लग्नगाठ बांधली होती. त्यावेळी त्यांच्या लग्नसोहळ्यात जवळचे नातेवाईक आणि मित्रपरिवास सहभागी झाला होता.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---