---Advertisement---

विराटला भेटण्यापूर्वी अनुष्का क्वारंटाईन; समोर असूनही एकमेकांना भेटणे झाले कठीण, पाहा फोटो

On: रविवार, ऑक्टोबर 17, 2021 8:45 PM
---Advertisement---

आयसीसी टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेला प्रारंभ झाला आहे. या स्पर्धेतील पहिल्या फेरीतील सामन्यांना सुरुवात झाली आहे, तर २३ ऑक्टोबरपासून सुपर १२ फेरीतील सामने सुरू होणार आहेत. भारतीय संघाचा पहिला सामना २४ ऑक्टोबर रोजी पाकिस्तान संघाविरुद्ध होणार आहे. या स्पर्धेच्या तयारीसाठी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली सध्या व्यस्त आहे. तो सध्या भारतीय संघाच्या बायोबबलचा भाग आहे.

मात्र, त्याची पत्नी अनुष्का शर्माला भारतीय संघाच्या बायोबबलचा भाग होण्यापूर्वी नियमांनुसार क्वारंटाईन कालावधी पूर्ण करावा लागत आहे. ज्याचे फोटो तिने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहे.

अनुष्का शर्माने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर चार फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, विराट कोहली तिच्यापेक्षा दूर आहे, तरीदेखील अनुष्का शर्मा आपले प्रेम व्यक्त करताना दिसून येत आहे. यापैकी दोन फोटोमध्ये विराट कोहली समोरच्या गॅलरीत आहे, तर दोन फोटोमध्ये तो गार्डनमध्ये असल्याचे दिसून येत आहे.

हे फोटो दुबईचे आहेत, जिथे भारतीय संघातील खेळाडू आहेत. या फोटोंवर अनुष्का शर्माने क्यूट असे कॅप्शन देखील दिले आहे. हा फोटो अवघ्या काही तासातच लाखो लोकांनी लाईक केला आहे. तर चाहते देखील विराट कोहली आणि अनुष्का शर्माचे प्रेम पाहून आपल्या प्रतिक्रीया देताना दिसून येत आहेत.

https://www.instagram.com/p/CVF69S2s1Na/?utm_medium=copy_link

अनुष्का शर्मा आणि वामिका या दोघीही विराट कोहलीला समर्थन करण्यासाठी स्टेडियममध्ये हजेरी लावत असतात. अनुष्काचा २०१८ मध्ये ‘झिरो’ चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात शाहरुख खान आणि कॅटरीना कैफ मुख्य भूमिकेत होते. त्यानंतर ती एकाही चित्रपटात झळकली नाहीये. काही महिन्यांपूर्वी तिच्या प्रोडक्शन हाऊसची वेब सिरीज ‘पाताल लोक’ अमेझॉन प्राईमवर तर नेटफ्लिक्स वर ‘बुलबुल’ प्रदर्शित करण्यात आली होती.

महत्त्वाच्या बातम्या – 

भारत-पाकिस्तान सामन्याच्या तिकिटांसाठी मित्रांची विराटकडे मागणी; कर्णधाराकडून आलं ‘असं’ उत्तर

गंभीर म्हणतो, आयपीएल २०२२मध्ये सीएसकेच्या ‘या’ ३ शिलेदारांना रिटेन करेल; पण धोनी…

टीम इंडिया सावधान! यूएईत पाकिस्तानी खेळाडूंचा राहिलाय बोलबाला, ८ खेळाडूंनी जिंकलेत ५८ सामने

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---