बुधवारी(8 आॅगस्ट) भारतीय संघाला लंडंनमधील भारतीय दुतावासाने स्नेहभोजनासाठी आमंत्रित केले होते. या स्नेहभोजनाच्या कार्यक्रमावेळी भारतीय संघाच्या फोटोत भारताचा कर्णधार विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्माही उपस्थित असल्याने त्यांना मोठ्या टीकेला सामोरे जावे लागले होते.
या फोटोवर बीसीसीआयकडून कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. परंतू आता अनुष्काने या फोटोमुळे झालेल्या टीकेला उत्तर दिले आहे.
ती याबद्दल म्हणाली, “जे कोणी याबद्दल काही भाष्य केले आहे, ती ट्रोल करण्याची कृती होती. मी ट्रोल्सवर प्रतिक्रिया देत नाही. त्यावेळी जे झाले ते नियमानुसारच झाले. या गोष्टीला खूप महत्त्व देऊ नका. ”
भारतीय दुतावासातील भारतीय संघाचा हा फोटो बीसीसीआयच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन शेअर करण्यात आला होता.
#TeamIndia members at the High Commission of India in London. pic.twitter.com/tUhaGkSQfe
— BCCI (@BCCI) August 7, 2018
या फोटोत भारतीय संघातील खेळाडू, सपोर्ट स्टाफ आणि भारतीय दुतावासातील काही अधिकारी होते. तसेच अनुष्काही या फोटोत विराट कोहलीच्या शेजारी उभी होती. यामुळे सोशल मिडियावर बीसीसीआय आणि विराट-अनुष्काला ट्रोल करण्यात आले होते.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
–मुंबईकर क्रिकेटर झाला भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक
–माजी दिग्गज खेळाडू म्हणतो, पृथ्वी शाॅला कसोटीत संधी द्यायलाच हवी
–आणि त्या शुन्य धावेची कायमची क्रिकेट वर्तुळात चर्चा सुरु झाली