भारतीय क्रिकेटप्रेमींना सध्या आगामी इंडियन प्रीमियर लीग २०२१ चे वेध लागले आहे. आयपीएलच्या या हंगामाचा ९ एप्रिल रोजी शुभारंभ होणार आहे. गतविजेता मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात हंगामातील सलामीची लढत रंगणार आहे. तत्पुर्वी आयपीएलमध्ये सहभागी खेळाडू मैदानावर कसून सराव करताना दिसत आहेत. याबरोबरच रिकामा वेळ मिळताच ते मौजमजा करतानाही निदर्शनास येत आहेत.
नुकताच रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा कर्णधार विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा यांचा मस्ती करतानाचा व्हिडिओ पुढे आला आहे.
बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि विराट हे क्रिकेटविश्वातील एक क्यूट जोडपे आहेत. चाहते त्यांच्यातील केमिस्ट्रीचे आणि बॉन्डिंगचे खूप कौतुक करत असतात. अनुष्काने इंस्टाग्रामवर तिचा आणि कोहलीचा मजा करतानाचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये अनुष्का विराटला उचलताना दिसत आहे. तिने विराटला एकदा नव्हे तर दोन वेळा उचलले आहे. त्यांचा हा मजेदार व्हिडिओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे. व्हिडिओ पाहून नेटकरी अनुष्काचे ‘शक्तीमान’ म्हणून वर्णन करत आहेत.
अनुष्काने जो व्हिडिओ शेअर केला आहे, त्या व्हिडिओमध्ये ती विराटला मागून मिठी मारते आणि नंतर उचलते. ती असे करत असताना, विराटच्या तोंडातून ‘ओ तेरी!’ असे निघते. तो म्हणतो, ‘परत कर.’ त्यावर अनुष्का म्हणते की, ‘तू मला मदत करू नको.’ यावर तो म्हणतो, ‘नाही करणार प्रॉमिस.’ यानंतर अनुष्का विराटला पुन्हा एकदा उचलते.
अनुष्काने विराटसोबतचा शेअर केलेला हा व्हिडिओ कदाचित जुना आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिले की, “मी ते खरंच केले का?”
https://www.instagram.com/p/CNWoBuhpQns/?utm_source=ig_web_button_share_sheet
विरुष्काचा हा मजेदार व्हिडिओ चाहत्यांना खूपच आवडला आहे. कमेंट बॉक्समध्ये काहींनी अनुष्काला ‘शक्तीमान’ तर काहींनी ‘तिला लेडी बाहुबली’ अशीही उपमा दिली आहे. यावर विराट कोहलीने हसणारे व हार्ट ईमोजी पोस्ट करून प्रतिक्रिया दिली आहे.
विराट आणि अनुष्का यावर्षी जानेवारीत पालक बनले होते. अनुष्काने एका गोंडस मुलीला जन्म देऊन तिचे नाव ‘वामिका’ ठेवले आहे. सध्या दोघांनीही वामिकाला मीडियाच्या चकाकीपासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
टीका केली, तरीही गुरु तो गुरुच! पृथ्वी शॉने प्रशिक्षक पाँटिंगची केली ‘चक दे’मधील शाहरुख खानशी तुलना