भारताची माजी टेनिसपटू सानिया मिर्झा हिने नुकताच आपल्या टेनिस कारकिर्दीला अलविदा केला. मागील महिन्यात तिने दुबई येथे आपला अखेरचा व्यावसायिक सामना खेळला होता. त्यानंतर आपल्या जवळच्या मित्र-मैत्रिणींसाठी तिने नुकतीच हैदराबाद येथे एक फेअरवेल मॅच खेळली. तसेच, त्यानंतर एक छोटेखानी समारंभ देखील आयोजित केला होता. असे असतानाच आता प्रसिद्ध अभिनेत्री व भारतीय क्रिकेट संघाचा प्रमुख क्रिकेटपटू विराट कोहली याची पत्नी अनुष्का शर्मा हिने तिची जाहीररित्या माफी मागितली आहे.
सानियाने 5 मार्च रोजी एक फेअरवेल मॅच व पार्टी आयोजित केली होती. या समारंभात अनेक क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती उपस्थित होते. विराट कोहली व अनुष्का शर्मा यांना देखील या कार्यक्रमाचे निमंत्रण होते. मात्र, ते या कार्यक्रमासाठी उपस्थित राहू शकले नाहीत. त्यामुळे अनुष्काने इंस्टाग्राम पोस्ट करत तिची माफी मागितली. तीने लिहिले,
‘सानिया तू तुझ्या प्रतिभा, समर्पण व त्यागाने एका पिढीला प्रेरणा दिली आहे. मी तिथे नव्हते यासाठी माफ कर. तुझ्याबद्दल प्रेम व आदर कायम आहे.’
टेनिस कारकीर्दीत सानियाने सहा ग्रँडस्लॅम जिंकण्याची यशस्वी कामगिरी केली होती. तसेच, कॉमनवेल्थ गेम्समध्ये तिने चार सुवर्णपदके आपल्या नावे केली आहेत. टेनिसला अलविदा केल्यानंतर आता सानिया दुसऱ्या नव्या भूमिकेत दिसणार आहे. सध्या सुरू असलेल्या वुमेन्स प्रिमियर लीगच्या पहिल्या हंगामात ती रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाचे मेंटरपद भूषवताना दिसतेय. आपण ही नवी भूमिका चांगल्या प्रकारे निभावू तसेच, भविष्यात मुलींना खेळांकडे आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू असे तिने म्हटले.
(Anushka Sharma Saying Sorry To Sania Mirza For Not Attend Her Farewell Party)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
जेव्हा गोलंदाजीचा बादशाह बॅटिंगमधील ‘किंग’ला नडलेला; मॉडर्न क्रिकेटमधील ‘हा’ किस्सा वाचाच
सचिनच्या ‘त्या’ हुशारीमुळे द्रविडने न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा केलेला बाजार, मालिकाही सोडवलेली बरोबरीत