Monday, March 27, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सचिनच्या ‘त्या’ हुशारीमुळे द्रविडने न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा केलेला बाजार, मालिकाही सोडवलेली बरोबरीत

सचिनच्या 'त्या' हुशारीमुळे द्रविडने न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा केलेला बाजार, मालिकाही सोडवलेली बरोबरीत

March 7, 2023
in क्रिकेट, टॉप बातम्या
Rahul-Dravid-And-Sachin-Tendulkar

Photo Courtesy: Twitter/ICC


सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड. केवळ भारतीय क्रिकेटच नव्हेतर जागतिक क्रिकेटमधील दोन सर्वोत्तम बॅटर्स. अनेक वर्ष एकत्रितपणे टीम इंडियासाठी खेळून या दोघांनी भारतीय क्रिकेटची सेवा केली. आज दोघेही रिटायर झाले असले, तरी दोघांबद्दलचा आदर कोणाच्याही मनातून कमी झाला नाही. त्यांचा जितका आदर केला जातो, तितकच भय ते खेळत असताना विरोधी बॉलर्सच्या मनात असायचं. सचिन नेहमी खेळ आपल्या भोवती घेऊन खेळायचा. द्रविड कदाचित त्याच्या एक पाऊल पुढे होता.‌ कारण होतं द्रविडचा संयम. 150 च्या स्पीडने येणारा बॉल जेव्हा द्रविड ‘वेल लेफ्ट’ करायचा तेव्हा, बॉलरला अक्षरशः राग यायचा आणि त्याचा संयम सुटल्यावर द्रविड त्याचा समाचार घ्यायचा. क्रिकेट इतिहासातील ‘ऑल टाईम ग्रेट डुओ’ म्हटल्या जाणाऱ्या सचिन-द्रविड जोडीने केवळ आपल्या बॅटिंगनेच नव्हे, तर कल्पकतेनेही विरोधी संघांना मात दिलेली. आज त्याचाच एक किस्सा.

साल होतं 1999. सचिन इंटरनॅशनल क्रिकेटमधील आपली दशकपूर्ती करत होता. अवघ्या चार वर्षांपूर्वी आलेल्या द्रविडने देखील टीम इंडियातील आपली जागा पर्मनंट केलेली. नव्या सिझनमध्ये न्यूझीलंड टेस्ट सीरिज खेळायला आली. पहिली टेस्ट होती मोहालीत. टीम इंडियाकडून त्या टेस्टमध्ये तिघांनी डेब्यू केला. देवांग गांधी, एमएसके प्रसाद आणि विजय भारद्वाज ही ती त्रिमूर्ती. स्टीफन फ्लेमिंगने टॉस जिंकला आणि डोळे झाकून बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. ऑक्टोबरचा महिना होता आणि थोडा पाऊस पडून गेलेला. त्यात उत्तर भारतातील थंडी. याचा फायदा न्यूझीलंडला झाला. डायोन नॅशने ऑकलँडमध्ये खेळत असल्याचा फील टीम इंडियाला आणला. जोडीला तसाच ख्रिस केर्न्स होता. अवघ्या एका सेशनमध्ये टीम इंडियाची वाताहात झाली. दुसऱ्या ओव्हरमध्ये पहिला विकेट पडलेल्या टीम इंडियाचा शेवटचा विकेट पडायला 27 ओव्हर पुरेशा ठरल्या. नॅशच्या 6 आणि केर्न्स-ओकोनरने दोन-दोन विकेट घेऊन टीम इंडियाची पहिली इनिंग फक्त 83 रन्सवर संपवली. मोठ्या अपेक्षा असलेल्या टीम इंडियाकडून हे कोणालाच अपेक्षित नव्हतं.

न्यूझीलंडला पहिल्याच दिवशी विजयाचा सुगंध येऊ लागलेला. मात्र, श्रीनाथने त्यांच्या मनसुब्यावर पाणी फेरलं. आठ रन्सवर दोन्ही ओपनर त्याने परत पाठवले. पण स्पिअरमन, फ्लेमिंग आणि ऍस्टलने थोडेफार योगदान देत कसंबस न्यूझीलंडला 215 पर्यंत नेलं. पाहुण्यांना 132 रन्सची आघाडी मिळाली. श्रीनाथनेही 6 विकेट्स घेत टीम इंडियाच्या बॉलिंग अटॅकचे नेतृत्व केलेलं.

दुसरी इनिंग आली आणि अचानक टीम इंडियाच्या बॅटिंगमध्ये बदल झाला. दोन्ही युवा ओपनर देवांग गांधी आणि सदगोपण रमेश न्यूझीलंडला नडले. 137 रन्सची ओपनिंग दिली. रमेश आऊट झाल्यावरही गांधी आणि द्रविडने तसाच समर्थपणे न्यूझीलंडच्या बॉलर्सचा सामना केला. टीम इंडिया 181 पर्यंत पोहोचलेली असताना गांधी आऊट झाला आणि कॅप्टन सचिन तेंडुलकरने मैदानात पाऊल ठेवले.

नेमके त्याचवेळी न्यूझीलंडने नवा बॉल घेतलेला. ख्रिस केर्न्स आपल्या नव्या स्पेलमध्ये आला आणि पहिल्या इनिंगसारखी बॉलिंग करू लागला. बॉल रिव्हर्स स्विंग होत होता. नजर बसलेला द्रविड अचानक चाचपडू लागला. द्रविड आणि सचिनला केर्न्सची तोड सापडेना. एका ओव्हरमध्ये दोघे दोन-तीनदा बीट होऊ लागले. न्यूझीलंड आणखी जोशात आली. इतक्यात सचिनने डोकं लावलं. ओवरच्या मध्ये त्याने द्रविडला एक आयडिया सांगितली. रिव्हर्स स्विंग त्या बाजूने होतो ज्या बाजूने बॉलची शाईन असते. सचिनने सांगितले, “मी नॉन स्ट्राइकवरून पाहू शकतो की शाईन कुठे आहे. शाईन इन स्विंगसाठी असेल, तर मी उजव्या बाजूला बॅट धरेल आणि शाईन आऊट स्विंगसाठी असेल तर डाव्या हातात.”

आयडिया कामी आली आणि सचिन आणि द्रविड पुन्हा एकदा किवी बॉलर्सवर तुटून पडले. ओव्हरमध्ये दोन तीनदा बीट होणारे बॅटर ड्राईव्ह मारताना पाहून सारे न्यूझीलंड प्लेयर्स चकित झाले. मात्र, त्यात कोणीतरी पाहिले होते की, हे दोघेही वारंवार बॅट ठेवण्याची जागा बदलत आहेत. त्यांना समजले सचिन आणि द्रविडचे काय चाललेय. अशात केर्न्सने क्रॉस सिम पकडून बॉल टाकला आणि द्रविडने तो देखील बाऊंड्री पार मारला. यावर केर्न्सला राहवलं गेलं नाही आणि त्याने सचिनला विचारलं, “इनस्विंग-आऊटस्विंगसाठी तुम्ही काय करत होता, हे आम्हाला समजले. पण, हे क्रॉस सीम बॉलसाठी काय उत्तर आहे?” त्यावर उत्तर देत सचिन हसून म्हणाला, “आमचं आधीच ठरलं होतं की, ज्यावेळी समजणार नाही बॉल कुठे जाईल, तेव्हा बॅट मधोमध धरायची.”

या रणनितीचा वापर करून दोघांनी शतकं मारली. गांगुलीही येऊन ताबडतोब फिफ्टी करून गेला. पहिल्या दिवशीच्या पहिल्या सेशनमध्ये 83 वर ऑल आऊट झालेल्या टीम इंडियाने दुसऱ्या इनिंगमध्ये 505 रन्सवर इनिंग डिक्लेअर केली.‌ ती टेस्ट ड्रॉ झाली, पण सचिनने लावलेली ही डोक्यालिटीची क्रिकेटच्या किश्यात कायमची नोंद झाली.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ज्या गावसकरांनी भारतीय क्रिकेटला ओळख मिळवून दिली, त्यांच्या दैदीप्यमान करिअरचा ‘असा’ झाला शेवट, वाचाच
भारतीय क्रिकेटमधील दुर्दैवाचं नाव- पुणेकर वसंत रांजणे, विंडीजविरुद्ध खेळताना रक्ताने माखलेला मोजा


Next Post
Virat-Kohli-And-James-Anderson

जेव्हा गोलंदाजीचा बादशाह बॅटिंगमधील 'किंग'ला नडलेला; मॉडर्न क्रिकेटमधील 'हा' किस्सा वाचाच

Sachin-Tendulkar-And-Brian-Lara

'हे' 4 दिग्गज जगात चमकले, पण क्रिकेटच्या पंढरीत ठरले अपयशी; यादीत दोन भारतीयांचा समावेश

Nathan-Lyon

लायनने आणखी किती काळ खेळावे? ऑसी दिग्गजाने दिले हे उत्तर

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143