Wednesday, March 29, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

WTC फायनलमध्ये भारताला ‘ही’ रणनीती आखावी लागणार! ऑस्ट्रेलियाला मात देण्यासाठी पाँटिंगचा महत्वाचा सल्ला

WTC फायनलमध्ये भारताला 'ही' रणनीती आखावी लागणार! ऑस्ट्रेलियाला मात देण्यासाठी पाँटिंगचा महत्वाचा सल्ला

March 7, 2023
in क्रिकेट, टॉप बातम्या
Ricky Ponting

Photo Courtesy: Twitter/cricketcomau


जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी ऑस्ट्रेलियन संघ पात्र ठरला आहे. इंदोरमध्ये भारताविरुद्ध तिसऱ्या कसोटीत विजय मिळवल्यानंतर ऑस्ट्रेलियाने या अंतिम सामन्यासाठी जागा पक्की केली. अंतिम सामना खेळणारा दुसरा संघ अद्याप निश्चित झाला नाहीये. भारतीय संघ अंतिम सामन्यात जागा पक्की करण्यासाठी प्रमुख दावेदार आहे. अशातच ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग याने भारताला या सामन्यासाठी मोलाचा सल्ला दिला आहे.

भारतीय संघ (Team India) कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात अद्याप पोहचला नाहीये. अंतिम सामन्यातील जागा पक्की करण्यासाठी भारतासह श्रीलंका संघ स्पर्धेत आहे. बॉर्डर गावसकर कसोटी मालिकेतील चौथा आणि शेवटचा सामना 9 मार्च रोजी सुरू होईल. भारताने जर या शेवटच्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाला मात दिली, तर अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी भारत देखील पात्र ठरू शकतो. हा चौथा कसोटी सामना सुरू होण्याआधीच रिकी पाँटिंग (Ricky Ponting) याने भारतीय संघाला अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी सल्ला दिला आहे.

पाँटिंग आयसीसी रिव्यू या कार्यक्रमात बोलताना त्याने भारतीय संघासाठी मोलाच्या गोष्टी सांगितल्या. पाँटिंगच्या मते जागतिक कसोटीपद स्पर्धेचा अंतिम सामना इंग्लडमध्ये आहे. भारत इंग्लंडमधील परिस्थितीमध्ये मोठी तफावत असल्याने त्याच पद्धतीने भारताने संघ तयार केला पाहिजे, असे पाँटिंगला वाटते. पाँटिंग म्हणाला, “जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना इंग्लंडमध्ये आहे. त्याठिकाणची परिस्थिती भारतात सुरू असलेल्या कसोटीपेक्षा खूप वेगळी आहे. अशात भारतीय संघाला वेगळी रणनीती आखण्याची गरज आहे.”

केएल राहुलची संघाला गरज – रिकी पाँटिंग
“केएल राहुल (KL Rahul) चांगल्या फॉर्ममध्ये नसल्याने शुबमन गिल (Shubman Gill) याला तिसऱ्या कसोटीत खेळण्याची संधी दिली गेली. पण तुम्ही जर अंतिम सामन्यात गेला आणि इंग्लंडच्या खेळपट्टीवर खेळला, तर गिल आणि राहुल दोघेही प्लेइंग इलेव्हनमध्ये असले पाहिजे. तुमच्याकडे रिषभ पंत (Rishabh Pant) सारखा महत्वाचा खेळाडू नाहीये. अशात राहुलला मध्यक्रमात खेळवू शकता आणि गिल डावाची सुरुवात करू शकतो. केएल राहुलकडे इंग्लंडमध्ये खेळण्याचा अनुभव आहे. भारतीय संघाने थोडा वेगळा विचार करायला हवा,” असे पाँटिंग पुढे म्हणाला.
(Ricky Ponting advises Indian team to win WTC Final)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना गावसकरांच्या करिअरवर ‘तो’ डाग कायमचा लागला; म्हणालेले, ‘कॅप्टन म्हणून खेद…’
चौथ्या कसोटीपूर्वी खेळपट्टी पुन्हा बनली चर्चेचा विषय, फोटो पाहून चाहत्यांमध्ये संभ्रम


Next Post
Rahul-Dravid-And-Sachin-Tendulkar

सचिनच्या 'त्या' हुशारीमुळे द्रविडने न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा केलेला बाजार, मालिकाही सोडवलेली बरोबरीत

Virat-Kohli-And-James-Anderson

जेव्हा गोलंदाजीचा बादशाह बॅटिंगमधील 'किंग'ला नडलेला; मॉडर्न क्रिकेटमधील 'हा' किस्सा वाचाच

Sachin-Tendulkar-And-Brian-Lara

'हे' 4 दिग्गज जगात चमकले, पण क्रिकेटच्या पंढरीत ठरले अपयशी; यादीत दोन भारतीयांचा समावेश

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143