Tuesday, March 21, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

‘त्याने निवृत्तीची सर्वोत्तम वेळ गमावली’, रिकी पाँटिंगचे आश्चर्यचकित करणारे विधान

'त्याने निवृत्तीची सर्वोत्तम वेळ गमावली', रिकी पाँटिंगचे आश्चर्यचकित करणारे विधान

March 7, 2023
in क्रिकेट, टॉप बातम्या
David Warner

Photo Courtesy: Twitter/cricketcomau


ऑस्ट्रेलियन संघाचा दिग्गज सलामीवीर फलंदाज डेविड वॉर्नर सध्या संघातून बाहेर आहे. भारताविरुद्धच्या बॉर्डर गावसकर कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात खेळल्यानंतर डेविड वॉर्नर तिसऱ्या आणि चौथ्या कसोटीत दुखापतीमुळे खेळू शकला नाही. वॉर्नरचे मागच्या काही काळातील कसोटी प्रदर्शन पाहता ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग याने मोठी प्रतिक्रिया दिली. पाँटिंगच्या मते वॉर्नरने मागेच कसोटीतून निवृत्ती घेतली पाहिजे होती, कारण येत्या काळात त्याला संघ व्यवस्थापन प्लेइंग इलेव्हनमधून वगळू शकते.

रिकी पॉंटिंग (Ricky Ponting) याच्या मते डेविड वॉर्नर (David Warner) आपल्या 100व्या कसोटी सामन्यानंतर या फॉरमॅटमधून निवृत्त झाला पाहिजे होता. मागच्या वर्षाच्या अखेरीत वॉर्नरने त्याचा 100वा कसोटी सामना केळला आणि यात जबरदस्त द्विशतक ठोकले. वॉर्नरने मागच्या 14 कसोटी सामन्यांमध्ये 26.39च्या सरासरीने 607 धावा केल्या, ज्यामध्ये एक द्विशतक आणि दोन अर्धसतके सामील आहे. बॉर्डर गावसकर कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये वॉर्नरने अवघ्या 26 धावाचे योगदान संघासाठी दिले. याच पार्श्वभूमीवर पाँटिंगने वॉर्नरविषयी मोठी प्रतिक्रिया दिली.

आयसीसी रिव्यू या कार्यक्रमात बोलताना रिकी पाँटिंग म्हणाला, “मला वाटेत ऑस्ट्रेलियन संघ जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात नक्कीच वॉर्नरला खेळवतील. ऍशेस मालिकेआधी त्यांना काही महत्वाचे निर्णय घ्यायचे आहेत. ब्रिटेनमध्ये डेविड वॉर्नरचे आकडेवारी जगातील इतर ठिकाणांच्या तुलनेत चांगली नाहीये. पण मला वाटत नाही की, हा वॉर्नरचा शेवट असेल. मला वाटते त्याला एका सामन्यासाठी (जागतिक कसोटी अजिंक्यपदाचा अंतिम सामना) पुन्हा संघात घेतील. याठिकाणी जर त्याने चांगले प्रदर्शन केले, तर तो ऍशेस मालिकेची सुरुवात करू शकतो.”

वॉर्नरने कसोटी फॉरमॅटमधून निवृत्तीची सर्वोत्तम संधी गमावली – रिकी पाँटिंग
वॉर्नरने दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध त्याचा 100वा कसोटी सामना खेळला होता आणि यात 200 धावा साकारल्या होत्या. पाँटिंगच्या मते या सामन्यानंतर त्याने कसोटी फॉरमॅटमधून निवृत्ती घोषित केली पाहिजे होती. “त्याने मेलबर्नमध्ये स्वतःचा 100वा कसोटी सामना खेळला होता आणि निश्चितच पहिल्या डावात 200 धावा साकारल्या होत्या. आणि आपल्या देशात कारकिर्दीचा शेवट करणे ही प्रत्येक खेळाडूची इच्छा असते.” दरम्यान, जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना 7 ते 11 जूनदरम्यान लंडनच्या द ओव्हल स्टेडियमवर खेळला जाणार आहे. भारताविरुद्धचा तिसरा कोसटी सामना जिंकल्यानंतर या अंतिम सामन्यासाठी ऑस्ट्रेलियन संघ पात्र ठरला आहे. भारताला याठिकाणी जागा पक्की करायची असल्यास एक कसोटी विजय गरजेचा आहे.
(‘David Warner missed the best time to retire’, Ricky Ponting’s shocking statement)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
वनडे मालिकेतून बाहेर पडला ‘हा’ ऑस्टेलियन गोलंदाज, बुमराहनंतर मुंबई इंडियन्ससाठी दुसरा मोठा धक्का
VIDEO: मुंबईच्या रस्त्यावर सूर्याने खेळला ‘सुपला शॉट’! व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल, तुम्ही पाहिला का?


Next Post
IND vs AUS (Rohit Sharma)

"अशा खेळपट्ट्या बनवून तुम्ही स्वतःची कमजोरी लपवता", दिग्गजाचा टीम इंडियाला घरचा आहेर

Virat-Kohli

जुन्या कामगिरीमुळे विराट पुन्हा वाचला, कसोटीतील फ्लॉप ठरूनही माजी दिग्गजाने व्यक्त केला विश्वास

fOOTBALL

आमदार चषक फुटबॉल । केपी इलेव्हन, इंद्रायणी एससी उपांत्यपूर्व फेरीत

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143