भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिले दोन सामने पार पडले. हे दोन्ही सामने भारताने जिंकले. यासोबतच मालिकेत विजयी आघाडी घेतली. दुसरीकडे, ऑस्ट्रेलिया संघाचा सलामीवीर फलंदाज डेविड वॉर्नर हा या दोन्ही सामन्यात फ्लॉप ठरला. पहिल्या सामन्यात त्याने 1 आणि 10 अशा धावा केल्या. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात त्याला पहिल्या डावात 15 धावा करता आल्या. यादरम्यान तो दुखापतग्रस्त झाल्यामुळे सामन्यात खेळू शकला नाही. वॉर्नर पुढील दोन्ही सामन्यांतून बाहेर पडला आहे. अशात तो मायदेशी परतला असून पुन्हा सोशल मीडियावर सक्रिय झाला आहे. त्याने एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात तो साऊथचा अभिनेता चियान विक्रम याच्या रूपात दिसत आहे.
डेविड वॉर्नर (David Warner) हा भारतीय सिनेमांचा चाहता आहे. तसेच, त्याने यापूर्वी अनेकदा भारतीय सिनेमातील प्रसिद्ध सीन्सची नक्कल करतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. अशात त्याने एक रील शेअर केली आहे, ज्यात त्याने आय (I) सिनेमातील अभिनेता चियान विक्रम (Chiyaan Vikram) याच्या चेहऱ्यावर एका ऍपच्या मदतीने आपला चेहरा लावला आहे.
या व्हिडिओत वॉर्नर पैलवान बनून हाणामारी करताना दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करत त्याने लिहिले आहे की, “हा माझ्या आवडत्या सिनेमांपैकी एक आहे. तुम्ही या सिनेमाचे नाव सांगा.”
खरं तर, ‘आय’ हा सिनेमा 2015 साली रिलीज झाला होता. या सिनेमाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले होते. या सिनेमातील गाणीही प्रेक्षकांच्या मनात बसली आहेत. एस शंकर यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले होते. तसेच, ए आर रहमान याने सिनेमाला संगीत दिले होते.
आयपीएल 2023मध्ये कर्णधार दिल्लीचे नेतृत्व
वॉर्नर ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघातून बाहेर पडला आहे. असे असले, तरीही त्याला आयपीएल 2023साठी पंतच्या जागी दिल्ली कॅपिटल्स संघाचा कर्णधार बनवले आहे. पंतचा मागील वर्षीच्या अखेरीस अपघात झाला होता. तो जवळपास एक वर्ष क्रिकेटपासून दूर राहील. अशात त्याच्या जागी फ्रँचायझीने वॉर्नरकडे नेतृत्व सोपवले आहे. वॉर्नर याने 2016च्या आयपीएल हंगामात सनरायझर्स हैदराबाद संघाला आयपीएलचे एकमेव विजेतेपद जिंकून दिले होते.
कसोटी मालिकेतून बाहेर
वॉर्नर भारताविरुद्धच्या तिसऱ्या आणि चौथ्या कसोटी सामन्यांच्या मालिकेतून बाहेर पडला आहे. तो दिल्लीमध्ये खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटीदरम्यान पहिल्या डावात फलंदाजी करताना दुखापतग्रस्त झाला होता. त्यामुळे त्याला दुसऱ्या डावातही खेळता आले नाही. (cricketer david warner in wrestler avatar pays tribute to popular tamil film)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मोठी बातमी! क्रिकेट खेळताना मैदानावरच कोसळला खेळाडू, उपचारापूर्वीच निधन, सहकाऱ्यांना धक्का
‘दादा’चे आयपीएलमधील 5 आवडते युवा खेळाडू कोण? स्वत:च सांगितली नावे