ऑस्ट्रेलिया संघ सध्या भारत दौऱ्यावर आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर गावसकर कसोटी मालिका संपल्यानंतर उभय संघात तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली जाणार आहे. पण वनडे मालिका सुरू होण्यापूर्वी ऑस्ट्रेलियन संघाला मोठा झटका बसला. त्यांचा वेगवान गोलंदाज झाय रिचर्डसन दुखापतीमुळे वनडे मालिकेत खेळू शकणार नाहीये. आयपीएल फ्रँचायझी मुंबई इंडियन्ससाठी देखील ही बातमी निराशानजक आहे.
आयपीएल 2023 पूर्वी झालेल्या खेळाडूंच्या लिलावात मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाने झाय रिचर्डसन (Jhye Richardson) याला संघात घेण्यासाठी दीड कोटी रुपये खर्च केले होते. पण आता शक्यतो रिचर्डसन दुखापतीमुळे संपूर्ण आयपीएल हंगामातून बाहेर पडू शकतो. मुंबई इंडियन्स संघासाठी ही मोठी समस्या यासाठी आहे. प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे आधीच आगामी आयपीएल हंगामात खेळणार नसल्याचे समोर आहे आहे. अशात संघाला वेगवान गोलंदाजाची आवश्यकात असतानाच झाय रिचर्डसनच्या दुखापतीची माहिती मिळाल्यानंतर मुंबई संघ व्यवस्थापनाची डोकेदुखी नक्कीच वाढली असावी.
माध्यमांतील वृत्तांनुसार रिचर्डसनने 4 जानेवारीला शेवटचा प्रोफेशनल सामना खेळला होता. या सामन्यात त्याचे हॅमस्ट्रिंग दुखावल्याचे समजलो हेते. त्यानंतर रिचर्डनस आतापर्यंत एकही सामना खेळला नाहीये. सुरुवातीला ही दुखापत गंभीर नसावी असे वाटत होते. याच दुखापतीमुळे त्याने बीबीएलच्या अंतिम सामन्यातूनही माघार घेतली. पण आता क्लब क्रिकेटमधून मैदानात पुनरागमनाचा प्रयत्न केल्यानंतर रिचर्डसनला यात अपयश आले आहे.
भारत दौऱ्यापूर्वी फिटनेस मिळवण्याचा प्रयत्न करत असलेल्या रिचर्डसनची दुखापत अधिकच वाढल्याचे सांगितले जात आहे. भारताविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी त्याला ऑस्ट्रेलिया संघात घेतले गेले होते. पण दुखापतीच्या कारणास्तव क्रिकेट ऑस्ट्रेलियाने त्याच्या जागा आता नाथन एलिस याला 16 सदस्यिय संघात सामील केले आहे. उभय संघांतील ही वनडे मालिका 17 मार्चपासून सुरू होईल. तत्पूर्वी दोन्ही 9 मार्चपासून अहमदाबादमध्ये शेवटचा कसोटी सामना खेळतील. या चौथ्या कसोटीत पुन्हा एखदा स्टीव स्मिथ ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व करेल. नियमित कर्णधार पॅट कमिन्स तिसऱ्या कसोटीनंतर चौथ्या कसोटीतूनही बाहेर पडला आहे. (Australian bowler out of ODI series against australia, second big blow for Mumbai Indians after Jasprit Bumrah)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ग्रेस हॅरिसमुळे गुजरातचा सलग दुसरा पराभव, शेवटच्या षटकात कुटल्या संघाच्या गरजेपेक्षा जास्त धावा
बावन्न वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय पदार्पण करणाऱ्या गावसकरांबद्दल या ५ गोष्टी माहित आहेत का?