Wednesday, March 29, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शेन वॉर्नच्या आयुष्यातील सर्वात कठीण काळ; सर्वांपासून लपून रडायचा ‘शतकातील सर्वोत्तम चेंडू’ टाकणारा फिरकीपटू

शेन वॉर्नच्या आयुष्यातील सर्वात कठीण काळ; सर्वांपासून लपून रडायचा 'शतकातील सर्वोत्तम चेंडू' टाकणारा फिरकीपटू

March 4, 2023
in क्रिकेट, टॉप बातम्या
Spinner-Shane-Warne

Photo Courtesy: Twitter/ICC


क्रिकेटच्या दुनियेत ‘फिरकीचा जादूगार’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेन वाॅर्नने आपल्या गोलंदाजीने मोठमोठ्या फलंदाजांना त्रास दिला आहे. मागच्या वर्षी आजच्याच दिवशी (4 मार्च) रात्रीच्या वेळी त्याचा मृत्यू झाला. त्याने त्याच्या कसोटी कारकिर्दीत 708 विकेट घेतल्या आहेत. त्याला जगातील महान गोलंदाजांपैकी एक मानले जाते. त्याने वयाच्या 52 व्या वर्षी जगाला निरोप दिला. त्याच्या निधनाने अनेकांना धक्का बसला. वाॅर्नच्या आयुष्यात एक काळ असा सुद्धा होती की, तेव्हा तो पूर्णपणे खचला होता.

सन 1969  व्हिक्टोरियाच्या फर्नट्री गलीमध्ये शेन वाॅर्नचा जन्म झाला होता. शेन वाॅर्नने (Shane Warne) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पदार्पणानंतर 3 वर्षानंतर लग्न केले. त्याची पहिली पत्नी सिमोन कॅलाहन योगा शिकवत होती. शेन वाॅर्न (Shane Warne Death) आणि सिमोन यांच्या नात्यात मध्येच दुरावा आला. ही 2005 ची घटना आहे, तेव्हा त्याचे लग्न होऊन 10 वर्ष झाली होती. सिमोनला वाॅर्नच्या अफेयरबद्दल समजल्यामुळे त्यामुळे ती पूर्णपणे तुटली होती. दोघांमधील नाते खराब झाले आणि गोष्ट घटस्फोटापर्यंत पोहोचली.

वाॅर्नने याबाबत मुलाखतीत सांगितले होते. वाॅर्नने तेव्हा म्हटले होते की, तो पूर्णपणे खचला होता. एवढेच नाही, तर तो एकटा असताना लपून रडत बसायचा. यानंतर या दोघांचे नाते कधीच पुन्हा व्यवस्थित झाले नाही आणि 2010 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. तो मुलाखतीत म्हणाला की, सिमोनसोबतचे नाते तुटणे आणि घटस्फोट होणे हे त्याच्या आयुष्यातील कठीण काळापैकी एक आहे. वाॅर्नच्या मुलांवर सुद्धा त्याचा खूप परिणाम झाला.

शेन वाॅर्न म्हणाला, “ब्रिटेनचे क्रिकेट चाहते त्याच्या घटस्फोटाच्या गोष्टी सतत लक्षात आणून देत होते, जे त्याला खूप त्रासदायक वाटायचे. क्रिकेट प्रेमी वाॅर्नच्या समोर ‘वेयर योर मिसेज गोन?’ हे गाणे गात होते जे एकूण त्याला खूप वाईट वाटायचे.” सिमोन आणि वाॅर्न यांना तीन मुले आहेत.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील महान खेळाडूंपैकी एक असलेल्या वाॅर्नने 1992 साली ऑस्ट्रेलियासाठी पदार्पण केले होते. त्याने त्याच्या कारकिर्दीत 145 कसोटी मालिकांमध्ये 708 विकेट्स घेतल्या. तसेच 194 एकदिवसीय क्रिकेटमध्ये 293 विकेट्स घेतल्या आहेत. आयपीएलच्या पहिल्या हंगामात म्हणजेच 2008 मध्ये राजस्थान राॅयल्सने त्याला कर्णधारपद दिले होते.

महत्त्वाच्या बातम्या-

वॉर्नच्या रूपात आयपीएलला मिळालेला पहिला चॅम्पियन कर्णधार, धोनीच्या सीएसकेला केले होते पराभूत

तू सर्वोत्तम ठरला! पॉंटिंगकडून वॉर्नला भावूक शब्दांत श्रद्धांजली

वॉर्नने गोलंदाजीत अनेक विक्रम केले, पण फलंदाजीतील ‘हा’ दुर्मिळ कारनामाही त्याच्याच नावावर


Next Post
Photo Courtesy: Twitter/@IPL

वॉर्नच्या रूपात आयपीएलला मिळालेला पहिला चॅम्पियन कर्णधार, धोनीच्या सीएसकेला केले होते पराभूत

Shane-Warne

वॉर्नने गोलंदाजीत अनेक विक्रम केले, पण फलंदाजीतील 'हा' दुर्मिळ कारनामाही त्याच्याच नावावर

Virat-Kohli-And-Steve-Smith-And-Shane-Warne

विराट की स्मिथ? शेन वॉर्नने सांगितलं होतं उत्कृष्ट कसोटी फलंदाज कोण ते...

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143