डब्ल्यूपीएलचा पहिला हंगाम चांगलाच रोमांचक ठरताना दिसत आहे. रविवारी (6 मार्च) रात्री गुजरात जायंट्स आणि यूपी वॉरिअर्स यांच्यांच्यात ‘काटे की टक्कर’ पाहायला मिळाली. यूपी संघाचा स्पर्धेतील पहिला, तर गुजरात जायंट्सचा दुसरा सामना होता. ग्रेस हॅरिस मॅच विनर ठरली. हॅरिसने शेवटच्या षटकात केलेल्या तुफान फटकेबाजीमुळेच यूपीला स्पर्धेची सुरुवात गोड करता आली.
मुंबईच्या डी. वाय. पाटील स्टेडियमवर उभय संघांतील ही लढत पाहायला मिळाली. गुजरात जायंट्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना मर्यादित 20 षटकांमध्ये गुजरात संघ 169 धावा करू शकला. प्रत्युत्तरात यूपी वॉरिअर्स संघ 7 बाद 175 धावा करत विजयी झाला. यूपी वॉरिअर्सला विजयासाठी शेवटच्या षटकात 19 धावांची आवश्यकता होती. अशा अटीतटीच्या परिस्थितीत ग्रेस हॅरिस (Grace Harris) आणि सोफिया अक्लेस्टन (Sophie Ecclestone) खेळपट्टीवर उपस्थित होत्या. स्ट्रेईकवर असलेल्या हॅरिसने संघासाठी अवश्यक असलेल्या 19 धावा चौकार आणि षटकारांच्या मदतीने मिळवल्या आणि विजय मिळवून दिला.
शेवटच्या षटकात गुजरात जायंट्सची एनाबेल संड्रलॅन्ड (Annabel Sutherland) गोलंदजीला आली होती. या निर्णायक षटकातील पहिल्याच चेंडूवर हॅरिसने तिला षटकार मारला. त्यानंतर पुढचा चेंडू तिने वाईड टाकला. त्यानंतर दुसरा चेंडूवर हॅरिसने दोन धावा घेतल्या. षटकातील तिसऱ्या चेंडूवर हॅरिसने चौकार मारला. एक षटकार एक चौकार पडल्यानंतर गोलंदाज संट्रलॅन्डवरचा दबाव वाढला. परिणामी पुढचा चेंडू पुन्हा वाईड गेला. षटकातील चौथ्या चेंडूवर संड्रलॅन्डने पुन्हा एक चौकार मारला. अशात संघाला पुढच्या दोन चेंडूंवर एक धाव हवी होती. पण संड्रलॅन्डने तरीही स्वतःच्या फलंदाजीचा धार कमी होऊ दिली नाही. षटकातील पाचव्या चेंडूवर तिने एक अप्रतिम षटकार मारत यूपीला विजय मिळवून दिला.
गोलंदाची विभागातील सर्वोत्तम प्रदर्शन पाहिले, तर गुजरात जायंट्सच्या किम गार्थ हिनेच केले. गार्थने टाकलेल्या चार षटकात 36 धावा खर्च करून 5 विकेट्स नावावर केल्या. ग्रेस हॅरीसव्यतिरिक्त यूपीच्या विजयात वरच्या फळीत फलंदाजीला आलेली किरण नवगिरे (Kiran Navgire ) हिचेही योगदान महत्वाचे राहिले. किरनने 43 चेंडूत 53 धावा कुटल्या. हॅरिसने या सामन्यात एकूण 26 चेंडू खेळले. यात 7 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने तिने नाबाद 59 धावां साकारल्या. दरम्यान, गुजराद जायंट्स संगाचा डूब्ल्यूपीएल स्पर्धेतील सलग दुसरा पराभव आहे. पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सकडून गुजरातला तब्बल 143 धावांनी पराभव स्वीकारावा लागलेला.
(Gujarat’s second consecutive loss thanks to Grace Harris, more runs than the beaten team needed in the last over)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
याला क्रिकेट हे नाव! तीन षटकात 5 बळी मिळवूनही ‘ती’ ठरली गुजरातसाठी व्हिलन
रातोरात लाखोंची क्रश झालेली एमेलिया कर आहे तरी कोण? कातिल स्माईलची सोशल मीडियावर जोरदार चर्चा