वुमेन्स प्रिमियर लीगच्या दुसऱ्या दिवशी दुसरा सामना युपी वॉरियर्झ व गुजरात जायंट्स यांच्या दरम्यान खेळला गेला. अंतिम षटकापर्यंत थरारक झालेल्या या सामन्यात अखेरीस युपी वॉरियर्झने एक चेंडू व तीन विकेट्स राखून सामना आपल्या नावे केला. या सामन्यात गुजरातची वेगवान गोलंदाज किम गार्थ हिने पाच बळी मिळवले. मात्र, तरीही तिच्या संघाला पराभूत व्हावे लागले.
𝗞𝗶𝗺 5️⃣𝗮𝗿𝘁𝗵! supremacy! 🔥#UPWvGG #TATAWPL #BringItOn #GujaratGiants pic.twitter.com/hwtWFbrvgb
— Gujarat Giants (@GujaratGiants) March 5, 2023
किम आयपीएल लिलावानंतर गुजरात संघाची भाग नव्हती. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी डिएंड्रा डॉटीन दुखापतग्रस्त होऊन बाहेर पडल्याने तिला तिची बदली खेळाडू म्हणून बोलावण्यात आले. ऑस्ट्रेलियावरून मुंबईत येऊन 24 तासही तिला झाले नव्हते. अशात तिला खेळण्याची संधी मिळाली. तिने संघ व्यवस्थापनाचा हा निर्णय योग्य ठरवला.
तिने आपल्या पहिल्याच चेंडूवर युपी वॉरियर्झची कर्णधार एलिसा हिलाला स्वतःच्या चेंडूवर झेल घेत बाद केले. त्यात षटकात तिने दुसरी सलामीवीर श्वेता सेहरावतलाही तंबूचा रस्ता दाखवल. तर, जागतिक टी20 फलंदाजी क्रमवारीत पहिल्या स्थानी असलेल्या ताहलिया मॅकग्राला शून्यावर तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतर तिसऱ्या शतकात गोलंदाजीला आल्यावर तिने जम बसलेल्या किरण नवगिरेला तसेच सिमरन शेख ला बाद करत पाच बळींचा टप्पा पार केला. तिने आपल्या पहिल्या 3 षटकात फक्त 16 धावा देत पाच बळी आपल्या नावे केले.
युपीला विजयासाठी 3 षटकात 53 धावांची गरज असताना ती पुन्हा गोलंदाजीसाठी आली. ग्रेस हॅरिसने तीन तर सोफी एक्लस्टनने एक चौकार मारत तिच्या या षटकात 20 धावा वसूल केल्या. या षटकामुळे युपीने सामन्यात पुनरागमन केले. अखेरच्या दोन षटकात उर्वरित 33 धावा काढत युपीने सामना एक चेंडू राखून आपल्या नावे केला.
(Diandra Dottin Replacement Kim Garth Took Five Wickets On WPL Debute But Conceded 20 Runs In Last Over)