जगातील सर्वात मोठी व्यावसायिक टी20 लीग असलेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या पुढील हंगामाला 31 मार्चपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेच्या सोळाव्या हंगामात आपले पहिले विजेतेपद मिळवण्यासाठी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (आरसीबी) संघ प्रयत्नशील असेल. मात्र स्पर्धा सुरू होण्यासाठी आता अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक असताना संघाचा एक प्रमुख फलंदाज दुखापतग्रस्त झाला आहे.
आरसीबीने यावर्षी आयपीएल लिलावात इंग्लंडचा अष्टपैलू विल जॅक्स याला आपल्या संघात सामील करून घेतले होते. यासाठी आरसीबीने तब्बल 3 कोटी 20 लाख अशी तगडी रक्कम मोजली. जॅक्स हा सध्या इंग्लंड संघासह बांगलादेश दौऱ्यावर आहे. उभय संघातील पहिल्या दोन वनडे सामन्यांमध्ये तो सहभागी झाला होता. तिसऱ्या सामन्यापूर्वी झालेल्या सराव सत्रात त्याच्या मांडीला दुखापत झाली. त्या कारणाने त्याने दौऱ्यातून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे.
त्याचीही दुखापत फारशी गंभीर नसल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, केवळ खबरदारीचा उपाय म्हणून त्याने विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला. पुढील 48 तासांमध्ये त्याची दुखापत किती गंभीर आहे याबाबत जाहीर करण्यात येईल. विल जॅक्स हा टी20 चा एक आदर्श क्रिकेटपटू म्हणून ओळखला जातो. त्याच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीवर नजर टाकल्यास दिसून येते की, त्याने 109 सामने खेळताना 157 पेक्षा जास्तच्या स्ट्राईक रेटने 2802 धावा केल्या आहेत. तसेच त्याच्या नावे 26 बळीही जमा आहेत. नुकत्याच झालेल्या एसए टी20 लीगमध्ये त्याने आपला हा शानदार फॉर्म कायम राहताना दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वाधिक धावा बनवल्या होत्या. त्याच्या योगदानामुळे प्रिटोरिया कॅपिटल्स स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान बनवण्यात यशस्वी ठरलेला.
(Will Jacks Ruled Out From Bangladesh Tour He Will Recover For IPL 2023 For RCB)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
बुमराहशी घेतलेला पंगा इंग्लंडला चांगलाच महागात पडला, लागोपाठ बाऊंसरचा मारा करत उडवलेली अँडरसनचीही झोप
चौदाव्या पीवायसी-एटीसी स्नुकर अजिंक्यपद 2023 स्पर्धेत कॉर्नर पॉकेट वॉरियर्स, कॉर्नर पॉकेट शुटर्स, द बॉईज संघांचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश