पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्टियानो रोनाल्डो हा अनेकदा गरजूंना मदत करताना दिसतो. जगातील सर्वात श्रीमंत फुटबॉलपटू असलेला रोनाल्डो सध्या आपल्या कारकिर्दीच्या अखेरीस आहे. त्याचवेळी त्याने आता एक असे काम केले आहे ज्यामुळे त्याचे सर्वत्र कौतुक होताना दिसतेय. महिनाभरापूर्वी तुर्की येथे झालेल्या विनाशकारी भूकंपात देशातील अनेक भागांमध्ये अतोनात नुकसान झाले. तेथील लोकांना मदत करण्यासाठी आता रोनाल्डोने पुढाकार घेतला आहे.
महिनाभरापूर्वी म्हणजेच 6 फेब्रुवारी रोजी सीरिया व तुर्की येथे मोठा भूकंप झाला होता. यामध्ये हजारो नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले. अनेक रहिवासी इमारती पडल्याने लाखो लोक बेघर झाले आहेत. या दोन्ही देशातील परिस्थिती पूर्ववत येण्यासाठी मोठा कालावधी लागू शकतो. त्या काळात अनेक सामाजिक संस्था तसेच श्रीमंत लोक मदत करताना दिसत आहेत. आता यामध्ये रोनाल्डोची भर पडली.
एका वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार, रोनाल्डोने संपूर्ण विमान या दोन देशातील नागरिकांसाठी जीवनापयोगी वस्तूंसह पाठवले यामध्ये जेवण, झोपण्यासाठी गाद्या व ब्लॅंकेट, लहान मुलांचे खाद्य तसेच कपडे यांचा समावेश आहे. या सर्व साहित्याची किंमत भारतीय चलनात तीन कोटींपेक्षा अधिक असल्याचे सांगितले जातेय.
रोनाल्डोने अशाप्रकारे मदत करण्याची ही पहिली वेळ नाही. काही दिवसांपूर्वीच एका लहान मुलाच्या मेंदूच्या शस्त्रक्रियेसाठी त्याने 67 लाख रुपये दिले होते. तर, पोर्तुगालमधील अनेक कर्करोग रुग्णालयांना तो दरवर्षी मदत करत असतो. तुर्कीचा फुटबॉलपटू मारीस देमिरल याने काही दिवसांपूर्वीच खुलासा केला होता की, रोनाल्डोची स्वाक्षरी असलेल्या जर्सीचा लिलाव करण्याची परवानगी स्वतः रोनाल्डोने आपल्याला दिली आहे. या पैशाचा वापर लोकांच्या जीवनउपयोगी वस्तूंच्या खरेदीसाठी केला जाईल.
(Cristiano Ronaldo Helping Turkey Earthquake Victims He Send Millions Of Feed And Daily Using Properties)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ग्रेस हॅरिसमुळे गुजरातचा सलग दुसरा पराभव, शेवटच्या षटकात कुटल्या संघाच्या गरजेपेक्षा जास्त धावा
बावन्न वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय पदार्पण करणाऱ्या गावसकरांबद्दल या ५ गोष्टी माहित आहेत का?