---Advertisement---

भारीच! वार्षिक पगाराव्यतिरिक्त शतक, द्विशतक अन् बळींच्या पंचकाचाही भारतीय खेळाडूंना मिळतो ‘वेगळा पैसा’

---Advertisement---

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्डांपैकी एक आहे. बीसीसीआयची वार्षिक कमाई इतर क्रिकेट बोर्डांपेक्षा ४ पट अधिक आहे. प्रत्येक कार्यालयात जसे महिन्याचा पगार देण्यात येतो, तसेच बीसीसीआयचा सुद्धा एक पगार असतो जो भारतीय खेळाडूंना देण्यात येतो. परंतु, हा पगार खेळाडूंना एका करारामार्फत दिला जातो. या करारात ए+, ए, बी आणि सी असे गट तयार करण्यात आले असून प्रत्येक गटाला वेगळी रक्कम दिली जाते. प्रत्येक वर्षाखेरीस खेळाडूंना या करारबद्द केले जाते.

परंतु फार क्वचित जणांना माहिती असेल की, वार्षिक पगाराव्यतिरिक्तही बीसीसीआयकडून भारतीय क्रिकेटपटूंना पैसे मिळतात. चला तर जाणून घेऊया, कसे ते?

बीसीसीआयच्या वार्षिक करारानुसार ए+ खेळाडूंना ७ कोटी रुपये मिळतात. ए गटातल्या खेळाडूंना ५ कोटी रुपये मिळतात. बी गटातल्या खेळाडूंना ३ कोटी आणि सी गटातल्या खेळाडूंना १ कोटी रुपये मिळतात. भारतीय संघातील विराट कोहली, रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह हे तीन खेळाडू ए+ गटात मोडतात, त्यामुळे त्यांना वार्षिक ७ कोटी रुपये मिळतात.

त्याचप्रमाणे प्रत्येक खेळाडूला बीसीसीआयद्वारे ‘मॅच फी’सुद्धा दिली जाते. ज्याच्यामध्ये प्रत्येक सामन्याची वेगळी फी असते. भारतीय संघाच्या खेळाडूंना एक कसोटी सामना खेळण्याचे १५ लाख रुपये मिळतात, एका एकदिवसीय सामन्याचे ६ लाख तर, एका टी२० सामन्याचे ३ लाख रुपये मिळतात.

भारतीय खेळाडूंना मिळतो बोनस मनी
भारतीय संघातून कसोटी खेळणाऱ्या खेळाडूला फक्त कसोटी सामन्यांत वेगळे बक्षीस दिले जाते. जर कुठल्या खेळाडूने कसोटी सामन्यात २०० धावा केल्या, तर त्याला ७ लाख रुपये दिले जातात. १०० धावा मारल्यास ५ लाख रुपये आणि ५ विकेट्स काढल्यास सुद्धा ५ लाख रुपये दिले जातात. ही रक्कम सामना फी सोडून वेगळी दिली जाते.

भारतीय संघातील खेळाडूंना जाहिरातीमार्फत आयोजकांकडून आणि आईपीएलद्वारे सुद्धा पैसे मिळत असतात. त्यामुळे जगातील सर्वात श्रीमंत खेळाडूंमध्ये भारतीय संघाचे खेळाडूंचा क्रमांक लागतो.

महत्त्वाच्या बातम्या-

‘काय मनमोहक उन्हाळा आहे’; अनुष्का इंग्लंडच्या वातावरणाचा लुटतेय आनंद, पाहून तुम्हीही पडाल प्रेमात

आनंदी आनंद गडे! सामना विजयानंतर केन्या महिलांचे लक्षवेधी सेलिब्रेशन, केला जबराट डान्स

याला म्हणतात धावांचा पाऊस! वर्ल्ड टेस्ट चँपियनशीपमध्ये धावांचा डोंगर उभारणारे ५ फलंदाज

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---