आयसीसी क्रमवारीत अव्व्ल स्थानी असलेल्या भारताच्या स्टार अष्टपैलू खेळाडूला म्हणजेच रवींद्र जडेजाला एका सामन्याची बंदी घालण्यात आली आहे. यामुळे तो पल्लेकेलच्या तिसऱ्या कसोटी सामन्याला मुकणार आहे. गैरवर्तवणुकीचे सहा गुण मागील २४ महिन्यात त्याच्या नावे आहेत, यामुळेच त्याला आता एका कसोटी सामन्यासाठी बंदी घालण्यात आली आहे.
इंदोर येथे झालेल्या कसोटी सामन्यात जडेजाच्या खात्यात आधीच गैरवर्तवणुकीचे ३ गुण जमा झाले होते. गैरवर्तवणुकीचे गुण हे गेल्या २४ महिन्यातील मोजले जातात. न्युझीलँड विरुद्ध इंदोर येथे ८ ऑक्टोबर २०१६ रोजी झालेल्या सामन्यात जडेजाच्या नावावर हे गुण जमा झाले होते. त्यावेळी तो खेळपट्टीवरून धावला होता.
आता जर ऑक्टोबर २०१८ पर्यंत जडेजाने कोणतेही गैरवर्तवण केले तर त्याच्या खात्यात एकूण ८ गुण जमा होऊन त्याला २ कसोटी सामने किंवा ४ एकदिवसीय सामने किंवा ४ टी२० सामन्यांची बंदी येईल.
जडेजाला एका कसोटीची आणि आणि अर्धी सामना फी दंड केल्यामुळे त्याचे २२.५० लाख रुपायांचे नुकसान झाले आहे. जे भारताच्या वार्षिक दरडोई उत्पन्नापेक्षा २२ पट जास्त आहे.