---Advertisement---

३७ षटकारांची बरसात होणाऱ्या त्या टी२० सामन्याबद्दल सर्वकाही…

---Advertisement---

अफगाणिस्तान प्रिमिअर लीगमध्ये परवा बाल्ख लिजन्ड्स आणि काबुल झ्वानन या संघात स्पर्धेतील 14 वा सामना झाला. या सामन्यात टी-20 क्रिकेटच्या इतिहासातील बरेच विक्रम मोडले आहेत.

या सामन्यात दोन्ही संघानी मिळून तब्बल 37 षटकार लगावले आहेत. प्रथम फलंदाजी करताना बाल्ख लिजन्ड्सने या सामन्यात 244 धावांचे विशाल लक्ष काबुल झ्वानन पुढे ठेवले होते.

बाल्ख लिजन्ड्सच्या फलंदाजांनी या सामन्यात 23 षटकार ठोकले. षटकारांचा बादशाह ख्रिस गेलने 10 षटकार ठोकले. त्याच बरोबर त्याने 12 चेंडूत अर्धशतक ठोकले आहे.

दुसऱ्या डावात काबुल झ्वाननच्या संघाने 223 धावापर्यंत मजल मारली. या संघाने एकुण 14 षटकार मारले. सलामीवीर हजरतुल्ला झझाइने एकाच षटकात 6 षटकार ठोकण्याची किमया केली.

गॅरी सोबर्स, रवी शास्त्री, हर्षल गिब्स, युवराज सिंग, रॉस व्हिटली यांनी एकाच षटकात 6 षटकार मारण्याची किमया यापुर्वी केली आहे. आता या दिग्गजांच्या यादीत हजरतुल्लाने स्थान मिळवले आहे.

एका षटकात 6 चेंडूत 6 षटकार मारणारे खेळाडू-

1968 – गॅरी सोबर्स

1985 – रवी शास्त्री

2007 – हर्षल गिब्स

2007 – युवराज सिंग

2017 – रॉस व्हिटली

2018 – हजरतुल्ला झझाइ

महत्वाच्या बातम्या-

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment