25 जून 1983 हा दिवस भारतीय क्रिकेटच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिला गेला. याच दिवशी कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारताने बलाढ्य वेस्ट इंडीजच्या संघाला धूळ चारत विश्वचषकावर मोहोर लावली. या घटनेला काल 38 वर्ष पुर्ण झाले. तब्बल चार दशकांपूर्वी घडलेली ही ऐतिहासिक घटना आजही लाखो क्रिकेटप्रेमी आणि खेळाडूंना प्रेरणा देते.
या विजयाबद्दल कर्णधार कपिल देव म्हणाले की, “या विजयानंतर देशात एक प्रेरणा निर्मितीच काम केलं. लोक मुलांना खेळाचे महत्त्व समजून सांगू लागले.”
कपिल देव पुढे म्हणाले, “आम्हाला आमच्या संघाबद्दल अभिमान आहे. ही स्पर्धा जिंकून आम्ही आमचा गौरव वाढवला आहे. विश्वचषक जिंकणे ही अद्भुत गोष्ट आहे. यामुळे संपूर्ण देशात आमची ओळख झाली. कोणतीही मोठी कामगिरी येणाऱ्या नव्या पिढीला खूपच प्रभावित करते. 1983 च्या या विजयाने खूपच बदल घडला आहे. आमच्या देशात आई-वडील खेळाचे महत्त्व देऊ लागले. ही मोठी गोष्ट आहे.”
2011 च्या विश्वचषकात अष्टपैलू कामगिरी केल्याने सामनावीराचा पुरस्कार पटकावलेल्या युवराजसिंगने आणि भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी ट्विट करून 1983च्या विश्वविजेत्या संघात शुभेच्छा दिल्या आहेत.
युवराज सिंग ट्विट केले की, “देशासाठी अभिमानास्पद क्षण. आमच्या वरिष्ठ खेळाडूंनी याच दिवशी 1983 चा विश्वचषक जिंकला. 2011 चा विश्वचषक जिंकण्यासाठी एक बेंचमार्क सेट केले होते. भारत सर्वच खेळात विश्वचॅम्पियन बनविण्यासाठी एक उम्मेद निर्माण झाली.”
रवी शास्त्री यांनी युवराजच्या ट्विटला उत्तर देताना लिहिले की, “धन्यवाद ज्युनिअर! तु मला आणि कपिल देव यांना हे ट्विट टॅग करू शकतो.” त्यावर पुन्हा युवराजने प्रत्युत्तर दिले की, “हा हा हा सिनिअर! आपण मैदानाच्या बाहेर आणि आतही दिग्गज आहात.”