महाराष्ट्र राज्य कबड्डी अससोसिएशन च्या आगामी ३ वर्षांच्या सर्व स्पर्धा आणि सर्व सामने आता ‘स्पोर्टवोट अँप ‘डिजिटल प्लॅटफॉर्म वर बघायला मिळतील. स्पोर्टवोत हे केवळ एक प्रसारक माध्यम नसून, संपूर्ण खेळ प्रक्रिया डिजिटल स्वरूपात खेळाडू आणि चाहत्यांसाठी मांडणारं एक सर्व समावेशक माध्यम आहे.
तळागाळातील खेळाडूंना प्रकाशझोतात आणण्याचा वसा घेतलेल्या स्पोर्टवोट ह्या कंपनीसाठी महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे डिजिटल पार्टनर म्हणून निवड होणे ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. स्पोर्टवोट ही कंपनी गेले साडे तीन वर्ष लोकल खेळ, लोकल संघ आणि खेळाडू ह्यांना जगभरातील स्पोर्ट्स प्रेमींसमोर आणण्यात कार्यमग्न आहे. स्पोर्टवोट ने आज पर्यंत तब्बल १०००० हुन अधिक कबड्डी स्पर्धा पूर्णपणे डिजिटल माध्यमात प्रसारित केल्या आहेत. ह्या अँप वर ३०००+ कबड्डी खळाडूंचे प्रोफाईल्स बनलेले आहेत. नुकत्याच झालेल्या शेरू क्लासिक महामुंबई कबड्डीचे प्रमुख शिल्पकार म्हणणं स्पोर्टवोटने कामगिरी केली आहे
एकीकडे क्रीडा क्षेत्रात आपले पाय घट्ट रोवलेली कंपनी आणि दुसरीकडे अशी संस्था ज्याचा राज्य कबड्डी संघाची कीर्ती सर्वदूर पसरली आहे. अनेक वर्ष राष्ट्रीय पातळीवर होणाऱ्या कबड्डी स्पर्धेत सलग दोनदा अंतिम सामान्यापर्यंत बाजी मारलेला संघ ह्या राज्याने सातत्याने घडविला आहे. ह्या दोन संस्थानच्या एकत्र येण्याने महाराष्ट्रातील कबड्डी पटूला विलक्षण फायदा होणार आहे. मुख्यतः प्रत्येक खेळाडू डिजिटल विश्वात आपला खेळ अनुभवू शकेल आणि त्यातून निश्चितच त्याचा साठी संधींचा एक समुद्र खुला होईल.
स्पोर्टवोटचे सर्वेसर्वा श्री. सिद्धांत अगरवाल म्हणतात, ” आम्हाला महाराष्ट्र राज्य कबड्डी अससोसिएशन सोबत काम करायला मिळतंय ह्याचा अत्यंत आनंद आहे. कबड्डी हा आपल्या मातीतला खेळ आहे आणि त्या कबड्डीचा खेळाडूला योग्यते प्रोत्साहन, प्रशंसा आणि आपला उद्धार करण्याची अचूक सनदी महाराष्ट्र राज्य कबड्डी अससोसिएशन मुले होते आहे आणि आता त्याला स्पोर्टवोट चा टेकनॉलॉजिची साथ मिळणार आहे. स्पोर्टवोट द्वारे महाराष्ट्रातल्या प्रत्येक खेळाडू आपला खेळ बघू शकेल. समोरच्याच्या खेळातून शिकू शकेल आणि आपला सुधारू शकेल आणि तो जगाला दाखवू शकेल. ह्या पेक्षा महत्वाचा आमच्यासाठी दुसरं काहीच नाही.”
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
गुजरात टायटन्सने शुबमन गिलला दिला नारळ? ट्विट करत लिहिले…
वर्ल्डकपचे वेळापत्रक झाले जाहीर; टीम इंडियाचा समावेश सोप्या गटात
भारतासाठी कर्दनकाळ ठरू शकतो ऑस्ट्रेलियाचा ‘हा’ धाकड फलंदाज, रोहितच्या नेतृत्त्वाखाली खेळलाय