---Advertisement---

वर्ल्डकपचे वेळापत्रक झाले जाहीर; टीम इंडियाचा समावेश सोप्या गटात

On: शनिवार, सप्टेंबर 17, 2022 4:39 PM
---Advertisement---

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेद्वारे प्रथमच आयोजित होणाऱ्या महिला अंडर नाईन्टीन विश्वचषकाचे वेळापत्रक नुकतेच जाहीर झाले आहे. दक्षिण आफ्रिकेत 16 दिवस ही स्पर्धा दोन शहरांमध्ये खेळली जाईल. 14 जानेवारी रोजी सुरू होणाऱ्या या स्पर्धेचा अंतिम सामना 29 जानेवारी रोजी खेळला जाईल. ही स्पर्धा 2021 मध्ये होणार होती. मात्र, कोरोना महामारीमुळे ही स्पर्धा दोन वर्ष पुढे ढकलण्यात आलेली.

या स्पर्धेत एकूण 16 संघ सहभागी होणार असून त्यात इंडोनेशिया आणि रवांडा यांचा समावेश आहे. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत इंडोनेशिया आणि रवांडा प्रथमच सहभागी होणार आहेत.

स्पर्धेत सहभागी होणाऱ्या 16 संघांची 4 गटात विभागणी करण्यात आली आहे. प्रत्येक गटातील अव्वल तीन संघ सुपर 6 फेरीत प्रवेश करतील. त्यानंतर अ गटातील संघ गट ड मधील संघांशी खेळतील. ब गटातील संघांचा सामना क गटातील संघांशी होईल. गट 1 आणि गट 2 मधील अव्वल 2 संघ उपांत्य फेरीत पोहोचतील. दोन्ही उपांत्य फेरीचे सामने 27 जानेवारीला होतील. तर, उपांत्य फेरीचा राखीव दिवस 28 जानेवारीला ठेवण्यात आला आहे.

ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, श्रीलंका आणि अमेरिका यांना अ गटात ठेवण्यात आले आहे. ब गटात इंग्लंड, पाकिस्तान, झिम्बाब्वे आणि रवांडा आहेत. क गटात आयर्लंड, इंडोनेशिया, न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिज आहेत. तर भारत, दक्षिण आफ्रिका, यूएई आणि स्कॉटलंड यांना ड गटात स्थान मिळाले आहे.

पहिल्या फेरीत दररोज चार सामने खेळवले जातील. पोचेस्ट्रम येथील जेबी मार्क्स ओव्हल आणि एनडब्ल्यू युनिव्हर्सिटी ओव्हल तर बेनोनी येथील विलोमूर पार्क आणि विलोमूर पार्क बी येथे सर्व सामने खेळवले जातील.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
टी20 विश्वचषकापूर्वी खूपच बिझी आहे भारतीय संघ; पाहा कधी, कोणाविरुद्ध खेळणार आहे सामने?
पहिल्या पुना क्लब बिलियर्ड्स अँड स्नूकर लीग स्पर्धेत द व्हर्लविंड्स, बॉल ब्रेकर्स संघांचा सलग दुसरा विजय
‘बेबी.. स्विटी..’, धोनी अन् पत्नी साक्षीचा क्यूट संवादाचा व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---