माजी भारतीय कर्णधार एमएस धोनी जरी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला असला, तरीही तो सतत चर्चेत असतो. तो सोशल मीडियावर जास्त सक्रिय नसतो. परंतु त्याची पत्नी साक्षी धोनी ही सोशल मीडियाचा भरपूर वापर करते. याच कारणामुळे धोनीही सतत चर्चेत असतो. आता या दोघांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत साक्षी आणि धोनीमध्ये छोटेसे पण मजेशीर भांडण होताना दिसत आहे.
व्हायरल व्हिडिओत दिसते की, साक्षी (Sakshi Singh) स्वत: कॅमेरावुमन बनत व्हिडिओ रेकॉर्ड करत आहे. ती कॅमेरा धोनीवर (MS Dhoni) फोकस करते. यावर लगेच धोनी तिला म्हणतो की, पाहा ही इंस्टाग्रामवरील फॉलोवर्स वाढवण्यासाठी काय काय करत आहे. यावर साक्षी म्हणते की, धोनीचे फॉलोवर्स माझ्यावरही प्रेम करतात. मी तुझाच एक भाग आहे बेबी.. स्विटी.. धोनी… थाला.. तुझ्या चाहत्यांना नेहमी तुला पाहायचे असते.
साक्षी आणि धोनीमधील हा क्यूट संवाद क्रिकेटचाहत्यांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे. या व्हिडिओ भरपूर लाईक आणि प्रतिक्रिया येताना दिसत आहेत.
.@msdhoni : Dekho aapne Instagram ke followers badhne ke liye, ye sab kar rahe hai… @SaakshiSRawat : All your followers love me also no..
Check out the hilarious convo here!????#Dhoni #Sakshi #MahiWay ❤️???? pic.twitter.com/B0VNZ4mUOH
— MS Dhoni Fans Official (@msdfansofficial) January 30, 2020
दरम्यान साल 2010 मध्ये 4 जुलैला धोनी आणि साक्षी सिंग (Sakshi Singh) लग्नबंधनात अडकले होते. आणि त्यानंतर चाहत्यांनी साक्षीवर सुद्धा तेवढेच प्रेम केले. हे दोघे भारतीय क्रिकेटची रोमँटिक जोडी बनले. खूप वेळा ते सोशल मीडियावर फोटो शेअर करून एकमेकांबद्दल प्रेम व्यक्त करत असतात.
या दोघांची ओळख कोलकातामधील एका हॉटेलमध्ये झाली होती. धोनी तेव्हा भारतीय संघासोबत त्या हॉटेलमध्ये थांबला होता. साक्षीची धोनीसोबत ओळख दोघांच्या कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून झाली होती. अहवालांनुसार धोनीने साक्षीचा नंबर त्याच मैत्रिणीकडून घेतला होता आणि मग ते दोघे एकमेकांना डेट करत होते. त्यांच्या लग्नाच्या ५ वर्षांनंतर त्यांना कन्यारत्न प्राप्त झाले आणि तिचे नाव झिवा (Ziva) ठेवण्यात आले.
महत्वाच्या बातम्या-
शेन बाँड हेड कोच, तर एमआय एमिरेट्सच्या कोचिंग स्टाफमध्ये ‘या’ दिग्गजांचा समावेश
भारताचा कर्णधार बनल्यानंतर संजूने दिली पहिली प्रतिक्रिया, राहुल-पंतबद्दलही लक्षवेधी भाष्य
चालू सामन्यात बदलता येणार प्लेइंग XI, आयपीएलसाठी आणलेला ‘इम्पॅक्ट प्लेयर नियम’ नेमका काय?