---Advertisement---

सुवर्णपदक जिंकल्यानंतर बॉलिवूड कलाकारांकडून नीरजवर कौतुकाचा वर्षाव; ‘खिलाडी’ अक्षय म्हणाला, ‘अब्ज लोकांच्या आनंदाश्रूचे…’

On: शनिवार, ऑगस्ट 7, 2021 9:10 PM
Neeraj Chopra
---Advertisement---

शनिवारी (७ ऑगस्ट) टोकियो ऑलिंपिकमध्ये भालाफेक स्पर्धेत भारताच्या २३ वर्षीय नीरज चोप्राने सुवर्णपदकावर आपले नाव कोरत भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून दिले. या सुवर्णपदकासह भारताच्या ताफ्यात आणखी एका पदकाची भर पडली. भारताने टोकियो ऑलिंपिक्समध्ये एकूण ७ पदकांवर बाजी मारली आहे.

नीरज चोप्राने भालाफेकीत सुवर्णपदक जिंकत इतिहास रचला आहे. त्याचबरोबर भारताने ७ पदक जिंकत आतापर्यंतच्या ऑलिंपिकमध्ये सर्वाधिक जास्त पदके मिळविण्याचा विक्रम देखील मोडला आहे.

नीरजने सुवर्णपदक जिंकल्यानंतर देशभरातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. तसेच बॉलिवूडमधील अनेक बड्या सिनेकलाकारांनी देखील समाज माध्यमावर नीरजच्या या कामगिरीचे कौतुक केले आहे. पाहूया कोण काय म्हणाले…

अक्षय कुमार
अक्षयने ट्वीट करत लिहिले, “सुवर्णपदक जिंकून इतिहास रचल्याबद्दल नीरज चोप्राचे अभिनंदन. अब्ज लोकांच्या आनंदाश्रूचे श्रेय तुम्हाला जाते. शाब्बास.”

https://twitter.com/akshaykumar/status/1423983957368999943

गोल्डी बहल
नीरज चोप्राचा फोटो शेअर करत चित्रपट निर्माता गोल्डी बहल म्हणाला, “नीरज चोप्राला भालाफेकीत सुवर्णपदक जिंकताना पाहणे हे खूप नशिबाची गोष्ट आहे. भारतासाठी हे ऍथलेटिक्‍समध्ये पहिले सुवर्णपदक आहे ही अत्यंत गर्वाची बाब आहे.”

https://twitter.com/GOLDIEBEHL/status/1423984123429855237

चेतन भगत
“धन्यवाद आणि खूप खूप अभिनंदन तुम्ही संपूर्ण देशाचे नाव गर्वाने उंच केले आहे,” असे चेतन भगत म्हणाला.

https://twitter.com/chetan_bhagat/status/1423985334786822148

चित्रांगदा सिंग
“नीरज चोप्राने सुवर्णपदक मिळवले, इतिहासात भारतासाठी हा एक स्मरणीय दिवस आहे. चॅम्पियन तुम्ही आमची मान गर्वाने उंच केली.”

https://twitter.com/IChitrangda/status/1423986687114285058

रणदीप हुड्डा
हुड्डाने हरियाणा भाषेत लिहिले, “खैंच राख्या सै मीटर, सर्वात मनमोहक रंगाचे पदक भारताला मिळाले.”

https://twitter.com/RandeepHooda/status/1423968169127944192

अनिल कपूर
“नीरज चोप्राचे खूप अभिनंदन,” असे लिहीत अनिल कपूरने नीरजचा एक फोटो शेअर केला आहे.

https://twitter.com/AnilKapoor/status/1423985866314108939

नम्रता शिरोडकर
“ऑलिंपिकच्या गेल्या १०० वर्षांच्या इतिहासात नीरज चोप्राने भालाफेकीत भारताला सुवर्णपदक मिळवून दिले. आजचा दिवस भारताच्या क्रीडा इतिहासातील सर्वात अविस्मरणीय दिवसांपैकी एक दिवस आहे. आज क्रीडाविश्वात एका सिताऱ्याचा जन्म झाला.”

https://www.instagram.com/p/CSRiUZWh2Ei/?utm_source=ig_web_copy_link

लता मंगेशकर
“नमस्कार, भारतासाठी सुवर्णपदक जिंकून देणाऱ्या नीरज चोप्रावर संपूर्ण भारतीयांना अभिमान आहे. मी त्याचे अभिनंदन करते,” असे लता मंगेशकर म्हणाल्या.

https://twitter.com/mangeshkarlata/status/1423989952702939139

याव्यतिरिक्त बऱ्याच कलाकारांनी नीरजवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

महत्वाच्या बातम्या-

-अभिमानास्पद! अभिनव बिंद्रानंतर ऑलिंपिकमध्ये सुवर्ण पदक जिंकणारा नीरज चोप्रा दुसराच भारतीय

-सुवर्ण पदक जिंकल्यानंतर पंतप्रधान मोदींनी नीरज चोप्रावर उधळली स्तुतीसुमने; म्हणाले, ‘त्याने जे साध्य केलंय…’

-इतिहास घडला! भारताच्या नीरज चोप्राने मिळवले भालाफेकीत सुवर्णपदक

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---