इंग्लंडचा माजी वेगवान गोलंदाज केविन पीटरसन याने जोफ्रा आर्चरला एक मोलाचा सल्ला दिला आहे. आर्चर आगामी आशिया चषकात खेळू शकणार नाही, असी माहिती नुकतीच समोर आली आहे. अशात तो हा संपूर्ण उन्हाळा मेडिकल टीमसोबत फिटनेसवर काम करेल. आर्चर आगामी ऍशेसमधून माघार घेत असल्याचे समजतात पीटरसन चांगलाच नाराज झाला.
केविन पीटरसनने आपल्या एका ब्लॉगमध्ये असे म्हटले की, “आर्चरमुळे खूप निराश आहे, खूपच निराश. इंग्लंड क्रिकेसोबतचा त्याचा प्रवास संपू शकतो, असे मला वाटते. फ्रँचायझींसोबतच्या कराराच्या काही बातम्या समोर आल्या, त्या मलाही माहिती आहेत. आर्चरसाठी हा खरोखर चांगला पर्याय आहे. त्याने 6 महिने आराम कराम करावा. त्यानंतर खेळण्यासाठी काही लीग निवडाव्या आणि वर्षातील काही महिने संथ गतीनेच गोलंदाजी करावी. यातून तो चांगला पैसा कमवेल आणि कारकीर्दही वाढवू शकेल.”
दरम्यान इंग्लंडचा हा दिग्गज वेगवान गोलंदाज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कमी काळात लोकप्रिय झाला. मात्र मागच्या तीन-चार वर्षांमध्ये त्याला खूपच कमी क्रिकेट खेळता आले आहे. त्याच्या डाव्या हाताच्या कोपऱ्याला झालेली दुखापत वरंवार आर्चरला क्रिकेटच्या मैदानातून बाहेर घेऊन जात आहे. यावेळी पुन्हा एकदा याच दुखापतीमुले आगामी ऍशेस मालिकेतून त्याला माघार घ्यावी लागत आहे. 2021 मध्ये आर्चरने दोन वेळा या दुखापतीवर शस्त्रक्रिया केली. मात्र त्याचा काहीच फायदा झाल्याचे दिसून येत नाहीये.
यावर्षी मोठ्या विश्रांतीनंतर त्याने आयपीएल फ्रँचायझी मुंबई इंडियन्ससाठी खेळण्याचा निर्णय घेतला. पण दुखापतीच्या कारणास्तव त्याला हंगाम अर्ध्यातूनच सोडावा लागला. आर्चरला ही दुखापत 2019-20 पासून सतावत आहे, जेव्हा दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून त्याला माघार घ्यावी लागली होती. त्यानंतर तो अनेकदा इंग्लंड संघातून आत बाहेर झाला आहे. (Archer’s international career is over! Amazing advice from Peterson on making money abroad)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आता झेड श्रेणी सुरक्षेसह फिरणार दादा, बंगाल सरकारचा मोठा निर्णय, काय आहे कारण?
‘हे प्रदर्शन त्यांच्यासाठीच…’, विजयाच्या एक दिवस आधीपर्यंत आयसीयूत होते मोहसिनचे वडील