पुणे: आकुर्डीच्या डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर आणि कोल्हापूरच्या स्कूल ऑफ आर्किटेक्चर डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनीअर अँड टेक्नॉलॉजी संघ यांच्यात विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चरच्या वतीने आयोजित आर्किटेक्चर महाविद्यालयाच्या आंतरमहाविद्यालयीन स्पोर्ट्स लीग, शिअरफोर्स स्पर्धेतील मुलांच्या फुटबॉलची अंतिम लढत रंगणार आहे.
वानवडी येथील राज्य राखीव पोलिस दलाच्या (एसआरपीएफ) मैदानावर ही स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेतील मुलांच्या गटाच्या पहिल्या उपांत्य लढतीत डॉ. डी. वाय. पाटील संघाने मराठवाडा मित्र मंडळाचे कॉलेज ऑफ आर्किटेक्चर संघावर ३-०ने मात केली. ही लढत अगदीच एकतर्फी झाली. ‘डीवायपी’ संघाच्या खेळाडूंनी सुरुवातीपासूनच गोलवर ताबा राखून मराठवाडा मित्र मंडळ संघाच्या खेळाडूंची दमछाक केली. यात लढतीच्या पंधराव्या मिनिटाला अयान यादवने गोल करून ‘डीवायपी’ संघाचे खाते उघडले. यानंतर १८व्या मिनिटाला अयानने दुसरा गोल करून ‘डीवायपी’ संघाची आघाडी २-०ने वाढवली. शरीक शेखने २२व्या मिनिटाला गोल करून ‘डीवायपी’ची आघाडी ३-०ने भक्कम केली. ही आघाडी शेवटपर्यंत कायम राखून ‘डीवायपी’ संघाने बाजी मारली.
दुसऱ्या उपांत्य लढतीत कोल्हापूरच्या स्कूल ऑफ आर्किटेक्चर डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनीअर अँड टेक्नॉलॉजी संघाने भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ आर्किटेक्चर संघावर १-०ने मात केली. यात लढतीच्या तेराव्या मिनिटाला अनिष पवारने केलेला गोल निर्णायक ठरला. यानंतर भारती विद्यापीठने बरोबरी साधण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र, त्यात त्यांना यश आले नाही.
नानावटी कॉलेज-ब्रिक कॉलेजमध्ये फायनल
मुलींच्या गटातील फुटबॉल स्पर्धेत डॉ. भानूबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर आणि ब्रिक स्कूल ऑफ आर्किटेक्चर यांच्यात अंतिम लढत रंगणार आहे. पहिल्या उपांत्य लढतीत नानावटी कॉलेजने एस. बी. पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर संघावर टायब्रेकमध्ये ३-२ने मात केली. निर्धारित वेळेत ही लढत गोलशून्य बरोबरीत सुटली. यानंतर शूटआउटचा अवलंब करण्यात आला. यात नानावटी कॉलेजकडून वैष्णवी निवेकर, सेजल ताटे, समृद्धी शेंडे यांनी गोल केले, तर पाटील कॉलेजकडून स्नेहा गायकवाड, निर्मिती हुले यांनाच गोल करता आले.
यानंतर ब्रिक स्कूलने श्रीमती काशीबाई नवले कॉलेज ऑफ आर्किटेक्चर संघावर सडनडेथमध्ये ५-४ने विजय मिळवला. निर्धारित वेळेत दोन्ही संघांना गोलशून्यची कोंडी काही फोडता आली नाही. लढत ०-० ही बरोबरीत सुटल्याने शूटआउटचा अवलंब करण्यात आला. यात आंचल मुगदिया, ईशा जोशी, सोनाली सिंग, भूमिका गायके यांनी गोल केले, तर पूर्वा चक्कर, श्रुती, सानिका पाटील, ऐश्वर्या निंबाळकर यांनी गोल केल्याने पुन्हा बरोबरी झाली. त्यामुळे सडनडेथचा अवलंब करण्यात आला. यात ब्रिककडून यशस्विनी पाटरेने गोल करून ब्रिक स्कूलला विजय मिळवून दिला.
इतर निकाल :
बास्केटबॉल – उपांत्यपूर्व फेरी – मुले – डी. वाय. पाटील, आकुर्डी – २४ वि. वि. यशोदा कॉलेज ऑफ आर्किटेक्चर – ४; भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ आर्किटेक्चर – १६ वि. वि. ब्रिक स्कूल ऑफ आर्किटेक्चर – ६. मुली – डी. वाय. पाटील, आकुर्डी – ८ वि. वि. ब्रिक स्कूल ऑफ आर्किटेक्चर – ६; मराठवाडा मित्र मंडळाचे कॉलेज ऑफ आर्किटेक्चर – १० वि. वि. एस. बी. पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर – ९.
व्हॉलिबॉल – मुले – डॉ. भानूबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर वि. वि. सिंहगड कॉलेज ऑफ आर्किटेक्चर २३-२५, २५-२२, १५-१०; एस. बी. पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर वि. वि. अनंतराव पवार कॉलेज ऑफ आर्किटेक्चर २५-१७, २५-१६; डॉ. डी. वाय. पाटील वि. वि. मराठवाडा मित्र मंडळाचे कॉलेज ऑफ आर्किटेक्चर २५-१५, २५-११.
(Architecture Intercollegiate Sports League. D. Y. Patil College in the final round)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
दुसऱ्या वनडेत टीम इंडिया चारीमुंड्या चीत! ऑस्ट्रेलियाचा अवघ्या 11 षटकात 10 विकेट्सने रेकॉर्डब्रेक विजय
दुसऱ्या वनडेतील पराभव भारताच्या जिव्हारी! ऑस्ट्रेलियानेच मिळवला सर्वात मोठा विजय