---Advertisement---

अर्जेटिनाने चारली इक्वेडोरला धूळ; मेस्सीने केला निर्णायक गोल

On: शुक्रवार, ऑक्टोबर 9, 2020 8:35 PM
---Advertisement---

कतार येथे होणाऱ्या २०२२ फुटबॉल विश्वचषकासाठीच्या पात्रता फेरीच्या पहिल्या सामन्यात अर्जेंटिनाने इक्वेडोरला १-० अशा गोल फरकाने पराभूत करत, आपल्या विश्वचषक मोहिमेला विजयाने प्रारंभ केला. अर्जेंटिनाकडून निर्णायक गोल दिग्गज लिओनेल मेस्सीने केला.

कोविड-१९ च्या वातावरणात विनाप्रेक्षक खेळल्या गेलेल्या सामन्यातील १२ व्या मिनिटाला इक्वेडोरचा बचावपटू लुकास ओकॅम्पोसने फाऊल केल्याने पंचांनी अर्जेंटिनाला पेनल्टी बहाल केली. मेस्सीने कसलीही चूक न करता अलगद चेंडू गोलपोस्टमध्ये ढकलत अर्जेंटिनाला १-० ने आघाडी मिळवून दिली.

आत्तापर्यंत अर्जेंटिनाने विश्वचषक पात्रता फेरीत इक्वेडोरसोबत खेळलेल्या आठपैकी अवघ्या एका सामन्यात पराभवाचे तोंड पाहिले आहे. मेस्सीने केलेल्या गोलनंतर इक्वेडोरच्या खेळाडूंनी बरोबरी साधण्याचा आटोकाट प्रयत्न केला, मात्र त्यांना यश लाभले नाही.

विजयानंतर, मेस्सीने आपली प्रतिक्रिया देताना म्हटले,

“पहिल्या सामन्यात विजय मिळवणे अत्यंत महत्त्वपूर्ण होते. कारण, आम्ही एक संघ म्हणून यापूर्वी मार्चमध्ये एकत्र खेळलो होतो. स्पर्धेची सुरवात विजयाने झाल्याने पुढील सामन्यासाठी खेळाडूंमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला आहे.”

अर्जेंटिनाचा पुढील सामना बोलिवियाविरुद्ध १४ तारखेला होणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---