भारत सरकारकडून प्रत्येकवर्षी खेळामध्ये भरीव कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना अर्जुन पुरस्कार दिला जातो. हा पुरस्कार आत्तापर्यंत ५० हून अधिक क्रिकेटपटूंना मिळाला आहे. यात अनेक महाराष्ट्राच्या क्रिकेटपटूंचाही समावेश आहे.
अर्जुन पुरस्कार भारत सरकारने १९६१ ला सुरु केला. ५ लाख रुपये रोख बक्षीस, प्रमाणपत्र आणि कांस्य धातूपासून बनवलेला अर्जूनाचा पुतळा असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. विजय मांजरेकर हे अर्जुन पुरस्कार मिळवणारे महाराष्ट्राचे पहिले क्रिकेटपटू आहेत. त्यांना १९६५ ला हा पुरस्कार मिळाला होता.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून(बीसीसीआय) दरवर्षी काही महिला आणि पुरुष क्रिकेटपटूंची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस केली जाते. त्यावर विचार होऊन हा पुरस्कार शिफारस केलेल्या खेळाडूंना द्यायचा की नाही हा विचार क्रीडा मंत्रालयाने क्रीडा पुरस्कारांसाठी नेमलेल्या निवड समितीद्वारे केला जातो.
अर्जून पुरस्काराने सन्मानित झालेले महाराष्ट्राचे क्रिकेटपटू –
१. स्मृती मंधना – २०१८
२. अजिंक्य रहाणे – २०१६
३. रोहित शर्मा – २०१५
४. झहिर खान – २०११
५. सचिन तेंडूलकर – १९९४
६. किरण मोरे – १९९३
७. शुभांगी कुलकर्णी – १९८५
८. रवी शास्त्री – १९८४
९. दिलीप वेंगसरकर – १९८१
१०. सुनिल गावसकर – १९७५
११. एकनाथ सोलकर – १९७२
१२. दिलीप सरदेसाई – १९७०
१३. अजित वाडेकर – १९६७
१४. चंदू बोर्डे – १९६६
१५. विजय मांजरेकर – १९६५
ट्रेंडिंग घडामोडी –
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे ५ महाराष्ट्रीयन खेळाडू
कसोटी खेळणाऱ्या सर्व देशांविरुद्ध परदेशात विजय मिळविणारे ५ संघ, टीम इंडियाबद्दल घ्या जाणून
सचिन नव्हे हे आहेत ते ५ खेळाडू ज्यांनी केली आहेत कसोटीत सर्वाधिक द्विशतके