आपल्या सर्वांना माहिती आहे की, क्रिकेट जगतात नाव आणि प्रसिद्धी मोठ्या प्रमाणात आहे. भारतीय संघाच्या खेळाडूंना त्यांच्या चांगल्या कामगिरीसाठी मोठे मानधन मिळते. परंतु भारतीय संघातील खेळाडू केवळ क्रिकेटच्या कमाईवर अवलंबून रहात नाहीत. तर त्यांच्या कमाईचे इतरही स्त्रोत आहेत.
कारण जर काही काळानंतर त्यांना संघात स्थान मिळाले नाही तर त्यांच्या आयुष्यात कसलीही समस्या उद्भवणार नाही.
आज भारतीय संघात असे अनेक खेळाडू आहेत जे खेळाबरोबरच इतर व्यवसायही करतात. आज आपण या लेखात अशाच खेळा़डूंचा आढावा घेणार आहोत जे खेळाव्यतिरिक्त इतर व्यवसायातूनही चांगले पैसे कमावतात.
एमएस धोनी-
भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) विराट कोहलीनंतर सर्वाधिक कमाई करणारा भारतीय खेळाडू आहे. धोनीची कमाईचा अधिकतर भाग हा क्रिकेट आणि जाहिरातींमधून येतो. त्याचबरोबर धोनीचे ‘माही रेसिडेन्सी’ नावाचे रांचीत हॉटेलदेखील आहे. धोनीचा ‘सेव्हन’ नावाने एक कपड्यांचा ब्रँड आहे. जे स्पोर्ट्सचे कपडे बनवते.
याव्यतिरिक्त धोनीची ‘स्पोर्ट्स फीट’ (Sports Fit) या नावाने एक जिम चैन आहे. ज्याच्या भारतामध्ये तब्बल २००पेक्षा अधिक जिम आहेत. धोनी एक फुटबॉल क्लब आणि हॉकी इंडिया लीगमधील संघ ‘रांची रेज’चाही मालक आहे. यांमधून धोनी दरवर्षी मोठ्या प्रमाणात पैसा कमावतो.
विराट कोहली-
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आपल्या खेळ आणि स्टाईलबरोबरच व्यवसायावरही पूर्ण लक्ष देतो. विराट एक फीटनेस सेंटर चैन ‘चिसेल फीटनेस’चा (Chisel Fitness) मालक आहे. तसेच टेक्नॉलॉजी स्टार्टअप ‘स्पोर्ट्स कॉन्वो’ विराटचा दुसरा व्यवसाय आहे. २०१५मध्ये विराट इंटरनॅशनल प्रीमियर टेनिस लीग (IPTL) मध्ये ‘यूएई रॉयल्स’ संघाचादेखील सहमालक होता.
विराट आयएसएलमधील संघ ‘एफसी गोवा’चाही (FC GOA) सहमालक आहे. यामध्ये विराटची वार्षिक गुंतवणूक एक कोटीपेक्षा कमी आहे. याबरोबरच विराट हा दिल्लीतील आरके पुरम भागातील एका हॉटेल्सचादेखील मालक आहे. विराटचा एक लाईफस्टाईल ब्रँडदेखील आहे जे कपडे आणि पादत्राणे बनवते. या ब्रँडचे नाव ‘राँग’ आहे.
सचिन तेंडुलकर-
भारतीय संघाचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) ७ वर्षांपूर्वी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. त्यातुन त्याने खूप पैसा कमावला आहे. क्रिकेटव्यतिरिक्त सचिनने ट्रॅव्हेल कंपनीत गुंतवणूकदेखील केली आहे. तसेच तो बंगळुरू आणि मुंबईमधील २ हॉटेल्सचादेखील मालक आहे.
युवराज सिंग-
भारतीय संघाचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू युवराज सिंगने (Yuvraj Singh) मागील वर्षी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. असे असले तरी तो व्यवसायामध्ये व्यस्त असतो. युवराज ई-कॉमर्स सेंटर चालवतो. जे खेळ आणि फीटनेसच्या वस्तू बनवते. कॅंसरमुक्त झाल्यानंतर युवराजने ‘युवीकॅन’ (YuviCan) नावाच्या संस्थेची सुरुवात केली होती. जे कँसरग्रस्त लोकांमध्ये जागरूकता पसरते.
ट्रेंडिंग घडामोडी-
-टीम इंडियातून बाहेर असलेल्या धोनीसाठी हा खेळाडू म्हणतो, मला काहीतरी खास करायचंय
-दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाची एबीला थेट कर्णधारपदाची ऑफर?? एबी म्हणतो…
-आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे ५ महाराष्ट्रीयन खेळाडू