यंदाच्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये (Paris Olympic) भारताचा स्टार एअर रायफल नेमबाज अर्जुन बबुता (Arjun Babuta) पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफलमध्ये पदक गमावलं. तो 15व्या शॉटपर्यंत पहिल्या तीनमध्ये होता. कधी दुसरा तर कधी तिसरा आला, पण पदक जिंकू शकला नाही. एक वेळ तो पहिल्या स्थानावर होता आणि लिहाओनेपेक्षा 0.1 गुणांनी मागे होता.
त्यानंतर त्याचा फॉर्म बिघडला आणि 16व्या शॉटनंतर त्याची चौथ्या स्थानावर घसरण झाली. चौथ्या स्थानावर पोहोचत त्यानं 17व्या आणि 18व्या शॉट्समध्ये एलिमिनेशन गाठलं. त्याचा सामना मारिचित मीरानसमोर होता.
बबुतानं 17व्या प्रयत्नात 10.3, तर मीराननं 10.6 शॉट मारला. 18व्या प्रयत्नात मिरानं पुन्हा 10.6, तर बबुतानं 9.9 शॉट केले. यासह बबुता 230च्या एकूण धावसंख्येसह बाद झाला. त्याच वेळी, चीनच्या शेंग लिहाओनं 252.2च्या ऑलिम्पिक रेकाॅर्डसह सुवर्णपदक जिंकले. तर स्वीडनच्या व्हिक्टर लिंडग्रेननं 251.4 गुणांसह रौप्यपदक जिंकले. क्रोएशियाच्या मॅरिसिच मिराननं 230 गुणांसह कांस्यपदक जिंकले. तर अर्जुनचा अंतिम स्कोर 208.4 होता.
अर्जुननं पात्रता फेरीत सातव्या स्थानावर राहून आठ नेमबाजांच्या अंतिम फेरीत स्थान मिळवलं होतं. 25 वर्षीय बबुतानं पात्रता फेरीत 105.7, 104.9, 105.5, 105.4, 104.0 आणि 104.6 गुणांसह एकूण 603.1 गुण मिळवले.
महत्त्वाच्या बातम्या-
“गोलंदाजीच्या क्षमतेमुळे रियान परागला…” माजी भारतीय खेळाडूचा मोठा दावा
पॅरिस ऑलिम्पिकला गालबोट, कमेंट्रीदरम्यान समालोचकाची जीभ घसरली; चॅनलनं उचललं मोठं पाऊल
“2028च्या ऑलिम्पिकमध्ये भारतीय क्रिकेटपटू जिंकणार सुवर्णपदक…” भारताच्या माजी प्रशिक्षकाचं मोठं वक्तव्य