विश्व क्रिकेटमधील महान फलंदाज सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन सध्या रणजी ट्रॉफीमध्ये कहर करतोय. अर्जुन तेंडुलकर याने आपले रणजीतील पदार्पण गोवा संघाकडून केले. त्याने आपल्या पदार्पणाच्या सामन्यात गोव्यासाठी झंझावती शतक झळकावले आणि दुसऱ्या सामन्यात आपल्या गोलंदाजीने दहशत निर्माण केली. झारखंड विरुद्धच्या सामन्यात त्याने एक असा चेेंडू टाकला, ज्यावर त्याने फलंदाजाच्या अक्षरश: हवेत दांड्या उडवल्या. त्याने केलेला हा क्लीन बोल्डचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अर्जुनने हे प्रदर्शन ईशान किशनच्या झारखंड संघाविरुद्ध खेळताना केले.
अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) याने पुन्हा एकदा आपल्या धमाकेदार खेळाचा नमुना दाखवला आहे. त्याने आधी फलंदाजीत आणि नंतर गोलंदाजीत अष्टपैलू कामगिरी केली, ज्याने त्याची सर्वत्र प्रशंसा केली जात. झारखंड संघाविरुद्ध मैदानात उतरलेल्या गोवा संघाने दुसऱ्या दिवशी पुनरागमन केले. पहिल्या दिवशी 4 गडी गमावत 280 धावा करणारा संघ दुसऱ्या दिवशी 106 धावा जोडत गारद झाला. झारखंड संघ 386 धावा करत सर्वबाद झाला. या डावात अर्जुनने एकच गडी बाद केला, पण तो चेंडू चांगला होता.
बोल्ड करने के बाद अर्जुन का किस तरह का सेलिब्रेशन है. pic.twitter.com/GknZJeeIaz
— binu (@binu02476472) December 21, 2022
अर्जुनच्या घातक चेंडूवर फलंदाजाच्या दांड्या गुल
भारतीय संघासाठी खेळलेल्या शाहबाज नदीम (Shahbaz Nadim) याला अर्जुनने एक धमाकेदार चेंडू टाकला. यावर फलंदाजाकडे बचावाचा कोणताच मार्ग नव्हता. चेंडू फलंदाजाला चकवा देत आतल्या बाजूला वळला आणि तिनही दांड्या हवेत उडाल्या. या डावात अर्जुनने 26 षटकात 90 धावा देत 1 गडी बाद केला. यात त्याने 6 षटके मेडन टाकली.
पहिल्या डावात गोव्याच्या दर्शन मिसल (Darshan Misal) याने भेदक गोलंदाजी करत 4 विकेट घेतल्या. संघाचा कर्णधार विराट सिंग (Virat Singh) आणि अनुभवी फलंदाज सौरव तिवारी (Sourav Tiwary) याचा बळी त्याने मिळवला. त्याने 33.1 षटकात 68 धावा देत 4 गडी बाद केले.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘शतकवीर’ पुजारा-गिलला कसोटी क्रमवारीत जबरदस्त फायदा, कुलदीपनेही घेतली 19 स्थानांची उडी
पुजारा-अश्विनची नजर कपिल देव आणि सचिन तेंडुलकरच्या विक्रमांवर, बांगलादेशविरुद्ध इतिहास रचण्याची संधी