भारताचे माजी दिग्गज क्रिकेट खेळाडू सचिन तेंडुलकर यांचा मुलगा अर्जुन तेंडुलकरने आगामी आयपीएल 2021 साठीच्या लिलावासाठी आपले नाव दाखल केले आहे. अर्जुनने काही दिवसांपूर्वीच सय्यद मुश्ताक अली टी 20 ट्रॉफी दरम्यान, मुंबई संघासाठी आपले पदार्पण केले होते. अर्जुनने यावेळी दोन सामन्यात मुंबईचे प्रतिनिधित्व केले होते.
अर्जुन सय्यद मुश्ताक अली टी 20 ट्रॉफी साठी मुंबई संघात पदार्पण करताच, आयपीएल लिलावासाठी देखील पात्र ठरला होता. अर्जुन ने सय्यद मुश्ताक अली टी 20 ट्रॉफीमध्ये मुंबईसाठी खेळलेल्या दोन्ही सामन्यात मुंबईला पराभव पत्करावा लागला. अर्जुनने देखील या सामन्यात विशेष कामगिरी केलेली नाही.
मीडिया रिपोर्टनुसार बीसीसीआयने आयपीएल 2021 साठी काही नियम बनवले होते. अर्जुन मुंबईकडून पदार्पण करताच या नियमात पात्र ठरला होता.अर्जुनने लिलावामध्ये २० लाख ही आपली बेस प्राईस ठेवली आहे. आजच लिलावासाठी नोंदणी केलेल्या क्रिकेटपटूंची यादी जाहीर झाली.
१,०९७ क्रिकेटपटूंनी केली नावनोंदणी
बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी जाहीर केलेल्या पत्रकानुसार आयपीएलच्या आगामी हंगामासाठी तब्बल १,०९७ खेळाडूंनी नावनोंदणी केली आहे. यामध्ये ८१४ भारतीय व २८३ विदेशी खेळाडूंची नावे आहेत. या यादीमध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केलेले २१ क्रिकेटपटू आहेत. तसेच १८६ आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेली विदेशी क्रिकेटपटू आहेत. आयसीसीचे सहयोगी देश असलेल्या देशांच्या २७ क्रिकेटपटूने देखील यात सहभाग नोंदविला आहे. उर्वरित क्रिकेटपटू हे कोणत्याही प्रकारचा आंतरराष्ट्रीय सामना खेळले नाहीत.
महत्वाच्या बातम्या:
शेतकरी आंदोलन: वातावरण तापलं! केरळमध्ये सचिन तेंडुलकरच्या पुतळ्यावर ओतला काळा रंग
आयपीएल २०२१ साठी केली इतक्या क्रिकेटपटूंनी नावनोंदणी
सध्या चर्चेत असलेल्या रिहानाचे ख्रिस गेलशी आहे खास नाते, जुना व्हिडिओ होतोय व्हायरल






