मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरने 19 वर्षांखालील केसी महिंद्रा शील्ड स्पर्धेत त्याच्या गोलंदाजीने सर्वांना प्रभावीत केले आहे. त्याने विजय मर्चंट एकादश संघाकडून खेळताना विजय मांजरेकर एकादश संघाविरुद्ध खेळताना दुसऱ्या डावात 70 धावांत 6 विकेट्स घेण्याची कामगिरी करत आपल्या संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला आहे.
या सामन्यात अर्जूनने घेतलेल्या 6 विकेट्समुळे विजय मांजरेकर संघाचा दुसरा डाव 216 धावांवर संपुष्टात आला. तसेच ते पहिल्या डावात 102 धावांनी पिछाडीवर असल्याने त्यांना विजय मर्चंट संघासमोर फक्त 115 धावांचे लक्ष्य ठेवता आले.
हे लक्ष्य देखील अर्जूनने वरुण लवांडेच्या गोलंदाजीवर षटकार मारत पूर्ण केले. यामुळे विजय मर्चंट संघाने 6 विकेट्सने या सामन्यात विजय मिळवला.
अर्जून बरोबरच विजय मर्चंट संघाकडून प्रग्नेश कानपिल्लेवरने पहिल्या डावात 155 धावांची शतकी खेळी करत महत्तावाचा वाटा उचलला. अर्जूनने या सामन्यात पहिल्या डावात 2 विकेट्स घेतल्या. त्यामुळे त्याने या सामन्यात मिळून एकूण 8 विकेट्स घेतल्या आहेत.
तसेच विजय मांजरेकर संघाकडून आर्या सातपुतेने दुसऱ्या डावात 92 धावांची नाबाद खेळी केली होती. मात्र त्याला अन्य खेळाडूंकडून साथ मिळली नाही. पण गोलंदाजीत प्रफुल्ल देवकातेने पहिल्या डावात 6 आणि दुसऱ्या डावात 3 असे मिळून एकूण 9 विकेट्स घेतल्या.
अर्जूनने केलेल्या या कामगिरीमुऴे त्याने भारत अ संघाचे दरवाजे ठोठावले आहेत.
संक्षिप्त धावफलक:
विजय मांजरेकर एकादश संघ – पहिला डाव- सर्वबाद 233 धावा
विजय मर्चंट एकादश संघ – पहिला डाव – सर्वबाद 335 धावा
विजय मांजरेकर एकादश संघ – दुसरा डाव- सर्वबाद 216 धावा
विजय मर्चंट एकादश संघ – दुसरा डाव – 4 बाद 120 धावा
महत्त्वाच्या बातम्या:
–अंबाती रायडूने जगातील सर्वात आवडती गोष्ट केवळ टीम इंडियासाठी सोडली
–केवळ एकच सामना खेळलेल्या उसेन बोल्टने फुटबॉल क्लबला केले अलविदा
–धोनीबरोबरच टी२० खेळत नसलेला खेळाडू म्हणतोय, धोनी संघाचा अविभाज्य भाग आहे