मंगळवारी (दि. 18 एप्रिल) हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडिअमवर सनरायझर्स हैदराबाद वि. मुंबई इंडियन्स संघात आयपीएल 2023 चा 25वा सामना पार पडला. या सामन्यात मुंबईने 14 धावांनी शानदार विजय मिळवत सलग तिसरा विजय साकारला. हैदराबादच्या डावातील अखेरच्या षटकात अर्जुन तेंडुलकर याने शानदार गोलंदाजी केली. त्याने या षटकात भुवनेश्वर कुमार याला बाद करण्यात यश मिळवले. त्याचबरोबर क्रिकेट जगतातील एक वर्तुळ देखील पूर्ण झाले.
मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाकडून सनरायझर्स हैदराबादच्या डावातील अखेरचे षटक अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) याने टाकले. अखेरच्या षटकात हैदराबादला विजयासाठी 20 धावांची गरज होती, मात्र, अर्जुनने फक्त 6 धावा दिल्या आणि भुवनेश्वर कुमार याच्या रूपात आयपीएलमधील पहिला बळी मिळवला.
अर्जुन याने भुवनेश्वर याला बाद करत 14 वर्षापूर्वींचा बदला घेण्याची कामगिरी केली. अर्जुनचे वडील सचिन तेंडुलकर हे 2008-2009 रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात शून्यावर बाद झाले होते. 15 चेंडूंचा सामना केल्यानंतरही सचिन खाते खोलू शकले नव्हते. विशेष म्हणजे त्यावेळी भुवनेश्वरने आपला पहिलाच चेंडू टाकताना सचिन यांना बाद केलेले. यातील चकित करणारी बाब म्हणजे सचिन त्यावेळी प्रथमच देशांतर्गत क्रिकेटमध्ये प्रथमश्रेणी क्रिकेट खेळताना खाते खोलू शकला नव्हता. त्यानंतर आता अर्जुनने देखील भुवनेश्वर याला टाकलेल्या आपल्या पहिल्याच चेंडूवर तंबूचा रस्ता दाखवला.
अर्जुनने मुंबईच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. त्याने या सामन्यात 2.5 षटके गोलंदाजी करताना 18 धावा खर्च करत 1 विकेट घेतली. यादी मागील सामन्यात अर्जुनने आपले आयपीएल पदार्पण केले होते. मात्र, आपल्या पहिल्या सामन्यात केवळ दोन षटके गोलंदाजी करताना त्याने 17 धावा दिलेल्या. त्या सामन्यात त्याला एकही बळी मिळवता आला नव्हता.
(Arjun Tendulkar Take Wicket Of Bhuvneshwar Kumar 14 Years Ago Bhuvneshwar Took Wicket Of Arjun Tendulkar Father Sachin Tendulkar)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ब्रेकिंग! माजी रणजीपटूचा समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, पत्नीचा जागीच मृत्यू
अर्जुनच्या कामगिरीची प्रीती झिंटालाही भुरळ; ट्वीट करत म्हणाली, ‘नेपोटिझममुळे खिल्ली उडवली गेली, पण…’