---Advertisement---

आयपीएल २०२१ च्या हंगामात खेळताना दिसू शकतो अर्जून तेंडुलकर; लिलावासाठी ठरला पात्र

On: गुरूवार, जानेवारी 28, 2021 5:24 PM
---Advertisement---

भारताचे माजी दिग्गज क्रिकेट खेळाडू सचिन तेंडुलकर यांचा मुलगा अर्जुन तेंडुलकर आगामी आयपीएल 2021 साठीच्या लिलावासाठी पात्र ठरला आहे. अर्जुनने काही दिवसांपूर्वीच सय्यद मुश्ताक अली टी20 ट्रॉफी दरम्यान वरिष्ठ मुंबई संघासाठी आपले पदार्पण केले होते. अर्जुनने यावेळी दोन सामन्यात मुंबईचे प्रतिनिधित्व केले होते.

अर्जुन सय्यद मुश्ताक अली टी 20 ट्रॉफीसाठी मुंबई संघात पदार्पण करताच तो आयपीएल लिलावासाठी देखील पात्र ठरला होता. अर्जुनने सय्यद मुश्ताक अली टी 20 ट्रॉफीमध्ये मुंबईसाठी खेळलेल्या दोन्ही सामन्यात मुंबईला पराभव पत्करावा लागला. अर्जुनने देखील या सामन्यात विशेष कामगिरी केली नाही.

मीडिया रिपोर्टनुसार बीसीसीआयने आयपीएल 2021 साठी काही नियम बनवले होते. अर्जुन मुंबईकडून पदार्पण करताच या नियमांनुसार पात्र ठरला आहे. अर्जुनला आता केवळ ऑनलाईन किंवा ऑफलाईन प्रक्रियेद्वारे आपले नाव लिलावासाठी समाविष्ट करायचे आहे. हे बघणे उत्सुकतेचे ठरेल की जर अर्जुनने आयपीएल लिलावात आपले नाव समाविष्ट केले, तर त्याला कोणता संघ आपल्या ताफ्यात समाविष्ट करतो.

आयपीएल 2021 चा लिलाव 18 फेब्रुवारीला चेन्नई येथे पार पडणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

भारत-इंग्लंड कसोटी सामन्यांत केवळ ‘या’ दोन खेळाडूंनाच करता आली त्रिशतकी खेळी

टीम इंडियाच्या कामगिरीवर इंग्लंडचे माजी कोच फिदा, म्हणाले “भारताला मायदेशात हरवणे कठीण”

कमालीच्या फॉर्ममध्ये आहे ‘हा’ इंग्लंडचा खेळाडू; भारतीय संघासाठी ठरु शकतो सर्वात धोकादायक

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---