भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याने क्रिकेटमध्ये विक्रमांचे विक्रम रचले आहेत. त्यामुळे क्रिकेटजगतात त्याची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. परंतु त्याचा मुलगा अर्जुन तेंडूलकर याला अद्याप स्वत:ला सिद्ध करता आलेले नाही. २२ वर्षीय अर्जुन देशांतर्गत क्रिकेट किंवा आयपीएलमध्ये दमदार प्रदर्शन करत भारतीय संघाच्या निवडकर्त्यांना प्रभावित करण्यासाठी झटतो आहे. परंतु त्याला स्वतला सिद्ध करण्याच्या फार कमी संधी मिळत आहेत.
अशात अर्जुनने मुंबई क्रिकेट संघाची साथ सोडत गोवा संघाकडून हात आजमवायचे ठरले आहे. गोवा संघाकडून अधिकाधिक सामने खेळत आपली प्रतिभा दाखण्यासाठी त्याने सरावालाही सुरुवात केली आहे. त्याचा नेटमध्ये सराव करतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
देशांतर्गत क्रिकेट स्पर्धा रणजी ट्रॉफी (Ranji Trophy), विजय हजारे ट्रॉफीचे आगामी हंगाम सुरू होण्यापूर्वी भारताचा दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याचा मुलगा अर्जुन (Arjun Tendulkar) याने मुंबई संघाला सोडले आहे. तर पुढील हंगाम तो गोवा या संघाकडून खेळण्याची शक्यता आहे. मुंबईने त्याला परवानगी देताना एनओसीही दिली आहे. यामुळे आगामी हंगामात तो गोव्यासोबत करार करू शकतो.
गोवा क्रिकेट संंघाचे सेक्रेटरी विपूर फडके यांनी म्हटले, आम्ही त्याला फिटनेस शिबीर आणि ट्रायलसाठी आंमत्रित केले आहे. त्याला फिटनेस टेस्टसाठी गोव्याला यावे लागेल. तसेच तो त्यात उत्तीर्ण होत त्याने ट्रायलचा टप्पाही पार पाडला तर क्रिकेट संचालन समिती योग्य तो निर्णय घेणार आहे.
सचिन रमेश तेंदुलकर स्पोर्ट्स मॅनेजमेंटने त्यांच्या विधानात म्हटले, अर्जुनला त्याच्या क्रिकेटच्या कामगिरीसाठी सर्वाधिक वेळ मैदानावर घालवण्याची आवश्यकता आहे. आम्हाला विश्वास आहे की त्याला सर्वाधिक स्पर्धामध्ये खेळण्याची संधी मिळेल आणि त्याचा खेळही उंचावेल. तो आपल्या क्रिकेटच्या एका नव्या अध्यायाची सुरूवात करत आहे.
https://twitter.com/cricketfanvideo/status/1558806613858758663?s=20&t=ob2KRX_SLUJ6GoDAWdsJUQ
अशात मुंबई क्रिकेट संघात निवड होऊनही खेळायच्या फार कमी संधी मिळालेला अर्जुन जोमाने तयारीला लागला आहे. त्याने नेट्समध्ये गोलंदाजीबरोबरच फलंदाजीचाही सराव सुरू केला आहे. स्वत: अर्जुनने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर सरावाचा व्हिडिओ शेअर करत याबद्दल माहिती दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
निवृ्त्तीआधीच विराट कोहलीची रिप्लेसमेंट फिक्स! ‘या’ खेळाडूला केलं जातयं तयार
कार्तिकची उपस्थिती पंतसाठी धोक्याची? युवा यष्टीरक्षक म्हणाला, ‘प्रशिक्षक आणि कर्णधार…’
बाबाचं दिडशतक प्रत्यक्षात पाहुन लेकीचा आनंद गगनात मावेना! पुजाराच्या मुलीचे व्हिडिओ व्हायरल