भारतीय संघाचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघाचा भाग आहे. अर्जुनला अद्याप खेळण्यासाठी अपेक्षित संधी मिळाल्या नाहीत. तो सध्या दिग्गज क्रिकेटपटू युवराज सिंग याचे वडिल योगराज सिंग यांच्यासोबत डीएवी कॉलेज क्रिकेट ऍकडमीमध्ये ट्रेनिंग घेत आहे. शनिवारी, 24 सप्टेंबर अर्जुनने त्याचा 23 वा वाढदिवस साजरा केला. यातच सोशल मीडियावर एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे, ज्यामध्ये योगराज सिंग हे अर्जुनसोबत भांगडा करताना दिसत आहे.
अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) सध्या चंडीगडमध्ये जेपी अत्रे स्पर्धा खेळण्यासाठी आला आहे. त्यामध्ये तो गोव्याकडून खेळणार आहे. तो योगराज सिंग (Yograj Singh) यांच्यासोबत सराव अभ्सास करत आहे. याचदरम्यान योगराज यांनी अर्जुनसोबतचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. त्यातच त्यांनी त्याच्यासोबत केलेल्या भांगड्याचा व्हिडिओ इंस्टाग्रामवर पोस्ट केला असून तो चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओला त्यांनी अर्जुनच्या वाढदिवसाचे सेलेब्रेशन, असे कॅप्शन दिले आहे.
देशांतर्गत क्रिकेटच्या आगामी हंगामापासून अर्जुन गोवा संघासाठी खेळताना दिसणार आहे. त्याने यापूर्वी मुंबई संघासोबत देशांतर्गत क्रिकेटमध्ये दोन टी-20 सामने खेळले होते. यावर्षीच्या रणजी हंगामात देखील तो मुंबई संघाचा भाग होता, पण त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली गेली नव्हती. प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळण्याच्या उद्देशानेच त्याने गोवा संघाचा हात धरल्याचे सांगितल जात आहे. मागच्या काही दिवसांमध्ये अर्जुनचे काही फोटो देखील चांगलेच व्हायरल होत आहेत. यामध्ये तो माजी अष्टपैलू युवराज सिंगचे वडील योगराज सिंग यांच्याकडून प्रशिक्षण घेताना दिसत आहे.
https://www.instagram.com/reel/Ci5eP-1vwiE/?utm_source=ig_web_copy_link
जेपी अत्रे स्पर्धेची सुरूवात 22 सप्टेंबरपासूनच झाली आहे. यामध्ये 100 पेक्षा अधिक क्रिकेटपटू खेळले असून त्यातील काहींनी भारताच्या राष्ट्रीय संघात पदार्पणही केले आहे. यामुळे अर्जुनही पुढे जाऊन भारताच्या संघात पदार्पण करेल अशी आशा आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध रजत पाटीदारसाठी भारताच्या वनडे संघाचे प्रवेशद्वार खुले?
सेहवाग, गेल, डिविलियर्स या दिग्गजांमध्येही आपले वेगळेपण जपणारा मॅक्यूलम
असा भारतीय क्रिकेटर ज्याला चक्क पाकिस्तानच्या मुलींनी केले होते प्रपोज