क्रिकेट इतिहासातील सर्वोत्तम खेळाडू मानल्या जाणाऱ्या भारतरत्न सचिन तेंडुलकर यांचा मुलगा अर्जुन तेंडुलकर आजकाल सोशल मीडियावर मोठ्याप्रमाणात अॅक्टिव आहे. दरम्यान, अर्जुनने नुकतेच इन्स्टाग्रामवर प्रश्न-उत्तरांचे एक सत्र केले होते. जिथे त्याने चाहत्यांच्या काही मजेशीर प्रश्नांची उत्तरे दिली आहेत.
या सत्राच्या दरम्यान एका चाहत्याने अर्जुन तेंडुलकरला विचारले की मुंबई इंडियन्समधील तुमचा आवडता खेळाडू कोण आहे? या प्रश्नाचे उत्तर देऊन अर्जुनने सर्वांनाच चकित केले आहे. कारण हे नाव सचिन तेंडुलकर किंवा रोहित शर्माचे नाही तर स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याचे आहे. बुमराह हा अर्जुनचा आवडता खेळाडू असल्याचे कारणही तसेच आहे कारण, बुमराहने मागील काही वर्षे मुंबई इंडियन्सकडून सातत्याने शानदार कामगिरी केली आहे .
यंदाच्या आयपीएल लीलावामध्ये अर्जुन तेंडुलकरला मुंबई इंडियन्सने 20 लाख रुपयांमध्ये आपल्या संघात समाविष्ट केले होते. मात्र अर्जुनला आयपीएल 2021 मध्ये एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. तसेच हे लक्षात घेणे गरजेचे आहे की कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आयपीएलचा 14 वा हंगाम अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आला आहे.
खरं तर, जेव्हा मुंबई इंडियन्सने अर्जुन तेंडुलकरचा 20 लाख रुपयांमध्ये आपल्या संघात समावेश केला होता, तेव्हा अनेकांनी सोशल मीडियावर अर्जुनला जोरदार ट्रोल करण्यास सुरुवात केली होती. लोक म्हणू लागले की अर्जुनला वशिलेबाजीमुळे आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळाली आहे.
अनेकांना आशा होती की आयपीएल 2021 मध्ये अर्जुनला मुंबईकडून पदार्पण करण्याची संधी मिळेल, पण कोरोनाच्या वाढत्या संख्येमुळे आयपीएल 2021 स्पर्धा अनिश्चित काळासाठी रद्द करण्यात आली आहे. हे बघणे उत्सुकतेचे ठरेल की आयपीएल 2022 च्या मेगा ऑक्शनमध्ये मुंबई इंडियनचा संघ अर्जुनला आपल्या संघात रिटेन करतो अथवा नाही.
महत्त्वाच्या बातम्या –
हरमनप्रीत कौर धावली बीसीसीआयच्या मदतीला, महिला संघाबाबत भेदभावाच्या आरोपांना दिले ‘हे’ उत्तर
मुंबई ते एजबॅस्टन दरम्यान भारतीय संघ होणार २४ दिवस क्वारंटाईन, तर ‘या’ खेळाडूंना मिळणार सूट
ऐकावे ते नवलच! ‘या’ तीन भारतीय भारतीयांना खेळावे लागले होते दुसऱ्या देशासाठी