पुणे। अर्णव शाह, सोहम जाधव, समर्थ साठे यांनी महाराष्ट्रीय मंडळातर्फे आयोजित हौशी खेळाडूंसाठीच्या बॅडमिंटन स्पर्धेतील १५ वर्षांखालील मुलांच्या गटात आपापल्या प्रतिस्पर्ध्यावर मात करून तिस-या फेरीत प्रवेश केला.
जोशीज बॅडमिंटन क्लब, देवधर बॅडमिंटन अकॅडमी व पुणे जिल्हा बॅडमिंटन संघटनेच्या मान्यतेने होणारी ही स्पर्धा टिळक रस्त्यावरील केळकर-भोपटकर हॉलमध्ये सुरू आहे. या स्पर्धेतील १५ वर्षांखालील मुलांच्या दुस-या फेरीत अर्णव शाहने आर्यन दरकवर १५-३, १५-३ अशी, तर सोहम जाधवने वैष्णव घोलेवर १५-१२, १५-१० अशी मात केली. समर्थ साठेने रेबंटा शर्मावर १५-१३, १६-१८, १५-९ अशी संघर्षपूर्ण मात करून आगेकूच केली.
सायली, सई, शुभ्राची विजयी सलामी
स्पर्धेतील ११ वर्षांखालील मुलींच्या गटातील सलामीच्या लढतीत सई शिंगणापूरकरने लास्या दिग्रजकरवर १५-५, १५-५ अशी, तर सायली अलोनीने नाविका जैनवर १५-६, १५-११ अशी आणि शुभ्रा वैशंपायनने पूर्वा मुंडळेवर १५-११, १५-१३ अशी मात करून विजयी सलामी दिली.
निकाल –
दुसरी फेरी – १५ वर्षांखालील मुले –
जीत काकडे वि. वि. सोहम पोकर्णा १५-११, १५-८,
यश खरे वि. वि. प्रणील इंगळे १५-५, १५-३,
अद्वैत काळे वि. वि. आदित्य राऊत १५-९, १५-१३,
नील चंडाक वि. वि. आदित्य शिरोडकर १५-८, १५-६,
मानस पाटील वि. वि. निमिश कानिटकर १५-६, १५-५,
आदेश खांडे वि. वि. कुशल जाधव १५-८, १५-११,
नील लुणावत वि. वि. अंश माहेश्वरी १५-१, १५-२,
रुजूल मोहिते वि. वि. साहिल खासनिस १५-१२, १५-१२,
सुजल ननावरे वि. वि. आशिष येवले १५-४, १५-८,
निनाद कुलकर्णी वि. वि. असीम कुंटे १५-३, १५-३,
निशिकांत धामगुंडे वि. वि. ऋतुज शाह १५-५, १५-२,
आदित्य कुरडुकर वि. वि. वेदांत सरदेशपांडे १६-१४, १५-१३,
ईशान देशपांडे क्षीतिज तरे १५-५, १५-६.
पहिली फेरी – १३ वर्षांखालील मुले –
आदित्य पर्वते वि. वि. अरिन साठे १५-५, १५-३,
आयुष कळभांडे वि. वि. सुयश करमरकर १५-७, १५-८,
ईशान वायचळ वि. वि. नील रानडे १५-११, १६-१४,
वेदव्रत थत्ते वि. वि. आर्यन दीक्षित १६-१४, २०-२१, १५-८,
क्षीतिज शर्मा वि. वि. मल्हार मोकाशी ९-१५, १५-५, १५-११,
कृष्णा जसुजा वि. वि. अर्हम गांधी १५-४, १५-५,
अल्हाद देशकर वि. वि. अभिषेक देशपांडे १५-९, १५-५,
आर्यन बागल वि. वि. विराज सराफ १५-११, १५-६,
मल्हार लिमये वि. वि. आर्यन तोरो २०-१८, १३-१५, १५-९,
खुशाल ठक्कर वि. वि. आर्यन पटवर्धन १५-८, १५-७,
सुदीप खराते वि. वि. सारंग माने १५-४, १५-६.
११ वर्षांखालील मुली –
साची संचेती वि. वि. श्रीया रोंघे १५-३, १५-५,
ऋतुजा वेलणकर वि. वि. समिहा गाडियार १५-१३, १२-१५, १५-१३,
शरयू रांजणे वि. वि. विदीशा कांबळे १५-१२, १५-९,
गार्गी कुंटे वि. वि. आर्या खुटळे १५-८, १५-१०,
उत्कर्षा कुलकर्णी वि. वि. सफा शेख १५-५, १५-५,
भक्ती देवकर वि. वि. रमा कानेगावकर १५-३, १५-३.