---Advertisement---

अर्रर्र..रिंकूचा नादचं खुळा! 24 कोटींच्या स्टार्कला रिंकू सिंगने दाखवलं आभाळ, पाहा व्हिडिओ

Rinku-Singh
---Advertisement---

आयपीएलच्या 17व्या हंगामाला सुरूवात व्हायला आता फक्त एकच दिवस बाकी आहे. तसेच सर्व संघांनी आयपीएल 2024 साठी जोरदार तयारी केली असून आता स्पर्धेला सुरूवात होण्याची सगळेजण वाट पाहत आहे. तर 22 मार्चला पहिला सामना साएसके आणि आरसीबीमध्ये पार पडणार आहे. या सामन्याआधी टीम इंडियाचा स्टार खेळाडू रिंकू सिंग याने खळबळ माजवली आहे. 

याबरोबरच आयपीएलच्या इतिहासामधील सर्वात महागडा (24.75 कोटी) ठरलेल्या मिचेल स्टार्क याला कडक सिक्सर मारला आहे. तसेच भल्याभल्यांच्यां दांड्या गुल करणाऱ्या स्टार्कला रिंकू सिंगने आभाळ दाखवलं आहे. तसेच त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यावेळी इंट्रा स्क्वॉड सराव सामन्यामध्ये मिचेल स्टार्क हा गोलंदाजी करत होता तर स्ट्राईकवर रिंकू सिंग पहायला मिळत आहे.

यावेळी स्टार्कने टाकलेला फुल टॉसवर रिंकू सिंगने गगनचुंबी षटकार मारला आहे. तसेच चेंडू बसल्यानंतर डायरेक्ट स्क्वेअर लेगला स्टेडियममध्ये गेल्याचे पहायला मिळाले आहे.  रिंकूची आयपीएलमधील सॅलरी ही 55 लाख आहे. मात्र लाखाचा खेळाडू करोडोंवर भारी पडल्याचे चित्र सध्या निर्माण झाले आहे. आयपीएलच्या 17व्या हंगामात कोलकाता नाईट रायडर्स संघाचा पहिला सामना हा दुसऱ्याच दिवशी म्हणजे 23 मार्चला सनरायझर्स हैदराबाद या संघाविरूद्ध होणार आहे. तर हा सामना संध्याकाळी सात वाजता सुरू होणार आहे.

आयपीएलच्या 17व्या हंगामासाठी कोलकाता नाईट रायडर्स संंघ – नितीश राणा, रिंकू सिंग, रहमानउल्ला गुरबाज, श्रेयस अय्यर (C), जेसन रॉय, सुनील नरेन, सुयश शर्मा, अनुकुल रॉय, आंद्रे रसेल, व्यंकटेश अय्यर, हर्षित राणा, वैभव अरोरा, वरुण चक्रवर्ती, केएस भरत, चेतन साकारिया, मिचेल स्टार्क , अंगक्रिश रघुवंशी, रमणदीप सिंग, शेरफेन रदरफोर्ड, मनीष पांडे, मुजीब उर रहमान, गुस ऍटकिन्सन, साकिब हुसेन.

महत्त्वाच्या बातम्या-

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---