---Advertisement---

Premier League: सिटीची शंभरी तर अर्सेनलचा वेंगरला विजयी निरोप

---Advertisement---

प्रिमियर लीगच्या शेवटच्या आठवड्यात सर्व संघांचे सामने एकत्र सुरु झाले आणि फुटबाॅल प्रेमींना एकाच वेळी १० सामने पहायची संधी मिळाली. पहिले ४ संघ कोणते ते जरी ठरले असले तरी कोणता संघ कोणत्या स्थानावर आपला हंगाम संपवतो ते पहाण्यासारखे होते. तसेच शेवटच्या ४ संघात काही बदल होतो का यावर सुद्धा सगळ्यांचे लक्ष होते.

अर्सेन वेंगरचा शेवटचा सामना असल्याने अर्सेनलने आपले सर्वस्व पणाला लावत सामना ०-१ ने जिंकला. याबरोबरच १,२३५ सामन्यात अर्सेनलसाठी मॅनेजर असलेल्या अर्सेन वेंगरला विजयी निरोप दिला. या हंगामात आपल्या घराबाहेरच्या सामन्यात साधारण खेळ करणार्या अर्सेनलतर्फे अयुबामियांगने विजयी गोल केला.

तर युनाएटेडने ३४ व्या मिनिटला सामन्यातील एकमेव गोल करत सामना १-० ने जिंकला. या बरोबरच त्यांनी गुणतालीकेत दूसरे स्थान मिळवले. गतविजेत्या चेल्सीला युसीएलमध्ये थेट प्रवेश मिळवण्यात तर यश आले नाही त्याचबरोबर त्यांनी शेवटचा सामना देखील न्यू कॅसल समोर ३-० ने गमावला.

युसीएलच्या अंतिम सामन्यात प्रवेश मिळवलेल्या लीवरपुलने परत एकदा एकामागे एक ४ गोल करत सामना ४-० ने जिंकला. गोल्डनबुटच्या शर्यतीत असलेल्या सलाहला केवळ एकच गोल करता आला. त्यामुळे त्याच्या गोल्डनबुटच्या आशा संपुष्टात आल्या. त्याने ३२ गोल्स केले तर पहिल्या क्रमांकावर असलेल्या मेस्सीच्या नावे ३४ आहेत. परंतु या ३२ व्या गोल बरोबरच त्याने ३८ सामन्यांच्या प्रिमियर लीगच्या एका हंगामात सर्वाधीक गोल्सचा विक्रम आपल्या नावे केला.

१०० गुणांच्या विक्रमाच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या मॅन्चेस्टर सिटीला सामना बरोबरीत सोडवावा लागेल आणि ९८ गुणांवर समाधान मानावे लागेल असे वाटत असताना अतिरिक्त वेळेत (९४ व्या मिनिटला) डी ब्रूनेच्या असिस्टवर जिससने गोल करत सिटीला १०० गुण मिळवून दिले. या बरोबरच सिटीने सर्वाधीक गोल्स पहिल्या आणि दूसर्या स्थानामध्ये १९ गुणांचे अंतर तसेच सर्वाधीक गोलफरक असे अनेक विक्रम आपल्या नावे केले.

तर काल टोट्टेन्हम हाॅटस्पर्स विरुद्ध लिसिस्टर सिटी सामन्यात तब्बल ९ गोल्स झाले. दोन्ही संघांनी एकामागे एक गोल करत सामन्यात आघाडी घेण्याचे प्रयत्न केले परंतु सामन्याचा निकाल अखेर स्पर्सच्या बाजूने लागला. स्पर्स तर्फे केनने २ तर लिसिस्टर सिटीतर्फे वार्डीने २ गोल्स केले.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment