भारत विरुद्ध वेस्ट इंडिज टी-२० मालिका सध्या सुरू आहे. या मालिकेतील पहिला टी-२० सामना शुक्रवार २९ जुलै रोजी ब्रायन लारा क्रिकेट स्टेडियम येथे खेळवला गेला. यासामन्यात भारताचा युवा गोलंदाज अर्शदीप सिंग याला कारकिर्दीतील दुसरा आंतरराष्ट्रीय सामना खेळण्याची संधी मिळाली. या सामन्यात विशेष प्रदर्शन केल्यानंतर पत्रकारांषी संवाद साधताना अर्शदीपने अनेक गोष्टींचा उलघडा केला.
सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत अर्शदीप म्हणाला की, “हा एक चांगला अनुभव होता. मी माझ्या कामगिरीवर खूश आहे. संघ जिंकू शकला त्यामुळे आनंद द्विगुणित झाला. खूप दिवसांनी खेळत होतो. मला फक्त पारस (म्हांबरे) सरांसोबत काम करून माझी गोलंदाजी सुधारायची आहे. मला वाटते की गोष्टी सोप्या ठेवणे, विकेटचा अधिक वापर करणे, हळू चेंडू वापरणे आणि माझे यॉर्कर्स वापरणे माझ्यासाठी फायदेशीर ठरले.”
“मला माझी भूमिका आणि जबाबदाऱ्यांची चांगली जाणीव आहे. संघ व्यवस्थापन आणि कर्णधार दोघांनीही मला गोलंदाज म्हणून माझ्या भूमिकेबद्दल सांगितले. यामुळे मला माझ्या भूमिकेबद्दल स्पष्टता आणि आत्मविश्वास मिळाला आणि त्यानंतर मी माझी रणनीती ठरवली. भुवी भाईने (भुवनेश्वर कुमार) दुसऱ्या बाजूने दबाव कायम ठेवला. त्यामुळे मला विकेट घेण्यास मदत झाली.”
अर्शदीपच्या पहिल्याच षटकात काइल मायर्सने षटकार आणि चौकार ठोकले, पण चौथ्या चेंडूवर गोलंदाज चौकार मारण्यात यशस्वी झाला. अर्शदीप म्हणाला की, “तो (मायर्स) सुरुवातीपासूनच आक्रमक खेळत होता आणि अशा परिस्थितीत तो बाउन्सरवर लांब शॉट खेळू शकला असता. मला असे वाटले की मी अशी गोलंदाजी करावी आणि मला त्याचा फायदा झाला.”
दरम्यान, अर्शदीपने या सामन्यात पहिल्याच षटकात विकेट घेत जगाला आपली प्रतिभा दाखवून दिली. अर्शदीपने चार षटकांत २४ धावा देत दोन बळी घेतले. त्याने या महिन्याच्या सुरुवातीला साउथहॅम्प्टनमध्ये इंग्लंडविरुद्ध पहिला टी-२० आंतरराष्ट्रीय खेळला होता.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘लवकरच पुनरागमन करणार’, झिम्बाब्वे दौऱ्यासाठी संघ जाहिर होताच केएल राहुलने केली भावनिक पोस्ट
दुसऱ्या टी२०त रोहित शर्मा गाजवणार मैदान! धोनी विराटनंतर ठरणार ‘असं’ करणारा केवळ सातवा खेळाडू
अर्शदीपने सांगितले आपल्या यशाचे गमक; ‘त्या’ दोन व्यक्तींबाबत बोलला मन जिंकणारी गोष्ट