यंदाच्या आयसीसी टी20 विश्वचषकातला (ICC T20 World Cup 2024) सेमीफायनल 2 सामना भारत विरुद्ध इंग्लंड (India vs England) यांच्यामध्ये खेळला जाणार आहे. गयाना स्टेडियमवर हा सामना रंगणार आहे. भारतीय संघाची धुरा कर्णाधार रोहित शर्माकडे (Rohit Sharma) तर इंग्लंडची धुरा जोस बटलरकडे आहे. परंतू या विश्वचषक स्पर्धेत भारताचा प्रतिभावान वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला (Arshdeep Singh) इतिहास रचण्याची सुवर्णसंधी आहे.
या विश्वचषक स्पर्धेत अफगाणिस्तानचा प्रतिभावान वेगवान गोलंदाज फजलहक फारुकीनं (Fazalhaq Farooqi) सर्वाधिक 17 विकेट्स घेतल्या आहेत. तर अर्शदीप सिंगनं 15 विकेट्स घेतल्या आहेत. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात जर अर्शदीप 3 विकेट्स घेण्यात यशस्वी ठरला तर तो एका टी20 विश्वचषकात सर्वाधिक विकेट्स घेणारा जगातील पहिला गोलंदाज ठरणार आहे. फारुकीच्या नावावर सध्या 17 विकेट्स आहेत. परंतू अफगाणिस्तान संघ या विश्वचषक स्पर्धेतून बाहेर पडला. त्यामुळे भारताच्या या युवा खेळाडूला इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात इतिहास रचण्याची सुवर्णसंधी असणार आहे.
एका टी20 विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स घेणारे खेळाडू
17- फजलहक फारुकी – अफगाणिस्तान – 2024
16 – वनिंदू हसरंगा – श्रीलंका – 2021
15 – अजंथा मेंडिस – श्रीलंका – 2012
15 – वनिंदू हसरंगा – श्रीलंका – 2022
15* – अर्शदीप सिंग – भारत – 2024
भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) इंग्लंडविरुद्धच्या सेमीफायनल सामन्यात 3 विकेट्स घेण्यात यशस्वी ठरला, तर हार्दिक इंग्लंडविरुद्ध टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा एकमेव भारतीय गोलंदाज बनेल. हार्दिकनं आतापर्यंत इंग्लंडविरुद्ध 14 विकेट्स घेतले आहेत. तर युझवेंद्र चहलनं (Yuzvendra Chahal) इंग्लंडविरुद्धच्या 11 टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात एकूण 16 विकेट्स घेतल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
बीसीसीआयचा मोठा निर्णय! तुषार-मयंकसह हे 7 वेगवान गोलंदाज झाले मालामाल
विराट-रोहितबद्दल कपिल देवनं केलेल्या वक्तव्यानं उडाली खळबळ!
‘या’ दोन रेकाॅर्डसहित दक्षिण आफ्रिकेनं मारली फायनलमध्ये धडक!