रविवारी (१८ एप्रिल) वानखेडे स्टेडियम, मुंबई येथे दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध पंजाब किंग्ज यांच्यात हंगामातील अकरावा सामना झाला. या रोमांचक लढतीत दिल्लीने ६ विकेट्सने पंजाबला पराभवाची धूळ चारली. दरम्यान पावरप्लेमध्ये दिल्लीचा सलामीवीर पृथ्वी शॉ याच्या रुपात मोठी विकेट मिळाल्यानंतर पंजाबचा डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग याने भन्नाट सेलिब्रेशन केल्याचे पाहायला मिळाले.
त्याचे झाले असे की, प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या पंजाब संघाने सलामीवीर मयंक अगरवाल (६९ धावा) आणि कर्णधार केएल राहुल (६१ धावा) यांच्या अर्धशतकाच्या जोरावर १९५ धावा उभारल्या होत्या. दरम्यान दिल्लीचा पदार्पणवीर लुकमान मेरीवालाने शिखर धवनच्या हातून अगरवालला झेलबाद केले. यावेळी गब्बरचे प्रसिद्ध ‘थाय-फायव्ह’ (thigh-five) सेलिब्रेशन पाहायला मिळाले होते.
पुढे पंजाबच्या १९६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सहाव्या षटकातच दिल्लीला पहिला धक्का बसला. पंजाबचा वेगवान गोलंदाज अर्शदीपने सहाव्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर सलामीवीर पृथ्वी शॉला ख्रिस गेलच्या हातून झेलबाद केले. लवकरच आपल्याला पहिली विकेट मिळाल्याचे पाहून अर्शदीपने नॉन स्ट्राईकर बाजूवर उभा असलेल्या धवनकडे पाहिले आणि त्याच्यापुढेच त्याच्या सेलिब्रेशनची नक्कल केली.
https://twitter.com/lodulalit001/status/1383819980932665355?s=20
अर्शदीपच्या या कृतीने सामना समालोचकांनाही त्याची चर्चा करण्यास भाग पाडले. ‘आहाहा, आता अर्शदीपही नव्या पद्धतीचे सेलिब्रेशन करत आहे,’ असे त्यांनी म्हटले. खरे तर, अर्शदीपने त्याच्या मनातील खुन्नस काढण्यासाठी तसे सेलिब्रेशन करत धवनला डिवचले होते. सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी त्याने धवनची नक्कल केल्याने वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
bruh Arshdeep imitating Dhawan after getting Shaw's wicket was the most cutest, passive-aggressive thing I've seen 😹❤️
— kavya 🌻 (@kavya262) April 18, 2021
https://twitter.com/kanyeahhh/status/1383819007657091075?s=20
KKR hyping nagarkoti and Mavi but the best among the batch is Arshdeep easily#kkr #PBKS
— KnightWatchman (@aknightwatchman) April 18, 2021
Arshdeep singh is getting confidence and consistent match after match.
Good sign for the future#pbksvsdc— Aayush (@Aayush_33_) April 18, 2021
Arshdeep continues to pick wickets with the short ball. Executes them so well 👌
— Haricharan Pudipeddi (@pudiharicharan) April 18, 2021
Arshdeep keeps picking wickets for fun. Consistently delivers when Punjab needs a wicket.
— arfan (@Im__Arfan) April 18, 2021
या सामन्यात पृथ्वीची विकेट ही अर्शदीपची एकमेव विकेट ठरली. त्याने पूर्ण सामन्यात ३ षटके गोलंदाजी करताना २२ धावा देत पृथ्वीची एकमेव विकेट घेतली. ३२ धावांवर त्याने पृथ्वीला पव्हेलियनला पाठवले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
पंचांना पुन्हा-पुन्हा विनंती करुनही नाही ऐकली ‘ही’ गोष्ट, कर्णधार केएल राहुलचा मोठा खुलासा
शेतकऱ्याचा मुलगा, ज्याने पदार्पणात केला अर्धशतकवीर अगरवालचा अडथळा दूर; वाचा त्याच्या संघर्षाची कहाणी